आयएएस सर्जना यादवने नोकरीसोबतच यूपीएससी परीक्षेची तयारी केली. सर्जना यादव २०१९ मध्ये नागरी सेवा परीक्षेत संपूर्ण भारतात १२६ क्रमांक मिळवून आयएएस अधिकारी बनली. तिने तिसऱ्या प्रयत्नात यश मिळवले होते.
आजच्या काळात यूपीएससीची तयारी करणारे बहुतेक उमेदवार कोचिंग क्लासेसवर अवलंबून असतात. या परीक्षेबाबत सर्जना यादव यांचा दृष्टिकोन वेगळा होता. एका मुलाखतीत सर्जना म्हणाली की, उमेदवाराला कोचिंग घ्यायचे आहे की नाही हे त्याच्या इच्छेवर अवलंबून आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्याकडे पुरेसे अभ्यास साहित्य आहे आणि तुमची रणनीती यूपीएससीसाठी चांगली आहे. तर तुम्ही सेल्फ स्टडीवर अवलंबून राहून यश मिळवू शकता, असे सर्जना सांगते.
सर्जना यादवच्या मते, जर तुम्ही शिस्तबद्ध आणि तुमच्या अभ्यासाप्रती प्रामाणिक असाल तर सेल्फ स्टडी हा सर्वात जास्त चांगला पर्याय आहे.
काम करताना परीक्षेची तयारी
सर्जना यादवने दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमधून अभियांत्रिकी पदवीचे शिक्षण पूर्ण केले. पदवीनंतर सर्जना यादव ट्रायमध्ये संशोधन अधिकारी म्हणून काम करू लागल्या. पूर्णवेळ नोकरीसोबतच सर्जना यूपीएससी परीक्षेची तयारी करत असे. पहिल्या दोन प्रयत्नात अयशस्वी झाल्यानंतरही तिने हार न मानता पुन्हा प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला आणि यावेळी ती यशस्वी झाली.
यूपीएससी परीक्षेच्या चांगल्या तयारीसाठी सर्जना यादवने २०१८ मध्ये नोकरी सोडली. सेल्फ स्टडीद्वारे सर्जना यादव २०१९ मध्ये यूपीएससीसाठी ऑल इंडिया १२६ रॅंकिग मिळवून पात्र ठरली.