विनायक चतुर्थी व्रत कसे आचरावे
या दिवशी सकाळी लवकर स्नान करून उपवास करावा आणि गंगेच्या पाण्याने पूजास्थानाचा अभिषेक करून पूजा सुरू करावी. श्रीगणेशाला पिवळ्या फुलांची माळ अर्पण केल्यानंतर धूप-दीप, नैवेद्य, अक्षदा आणि त्यांचा आवडता दुर्वा अर्पण करावा. यानंतर मिठाई किंवा मोदकचा नैवेद्य दाखवाव. शेवटी व्रत कथा वाचून गणपतीची आरती करावी. यादिवशी चंद्र दर्शन करू नये.
विनायक चतुर्थी शुभ मुहूर्त
उदयतिथीमुळे २३ फेब्रुवारी, गुरुवारी विनायक चतुर्थी व्रत पाळण्यात येणार आहे. २३ फेब्रुवारीला पहाटे ३ वाजून २४ मिनिटांनी विनायक चतुर्थीला सुरुवात होईल. तर २४ फेब्रुवारी रोजी रात्री १ वाजून ३३ मिनिटांनी चतुर्थी तिथी समाप्त होईल. यासोबतच विनायक चतुर्थी पूजेचा शुभ मुहूर्त ११ वाजून २६ मिनिटे ते दुपारी १ वाजून ४३ मिनिटापर्यंत आहे.
विनायक चतुर्थी शुभ योग
फाल्गुन महिन्यातील विनायक चतुर्थीला चार विशेष योग तयार होत आहेत. हा योग अतिशय शुभ ठरणार आहे. या शुभ योगात पूजा केल्याने सर्व भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतील आणि जीवनात सुख-समृद्धी नांदेल. विनायक चतुर्थीला सकाळपासून शुभ योग तयार होत असून तो रात्री ८.५८ पर्यंत राहील. विनायक चतुर्थीला रवि योग देखील तयार होत आहे जो सकाळी ६ वाजून ५३ मिनिटापासून सुरू होईल आणि २४ फेब्रुवारीला पहाटे ३ वाजून ४४ मिनिटापर्यंत राहील. यासोबतच सर्वार्थ सिद्धी योगही तयार होत आहे.
देवांनी देखील केले होते हे व्रत
फाल्गुन शुक्र चतुर्थीला सुवर्ण गणेश मुर्तीचे टिळा लावून पूजन करावे. तिळाच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवा. तिळाचे हवन करा, ब्राम्हणास तिळाच्या पदार्थ बनवून जेवणाचं आमंत्रण द्या. तुम्ही देखील तिळ खा आणि तिळाचे पारायण करा. या प्रकारे प्रत्येक शुक्ल पक्षातील चतुर्थीला व्रत करावे आणि पाचव्या महिन्यात आधी पूजलेली मुर्ती ब्राम्हणास द्या. यामुळे सर्व विघ्न दूर होतात. असे सांगितले जाते की, प्राचीन काळी अश्वमेधाच्यावेळी महाराज सगर, त्रिपुरासुर युद्धावेळी महादेवांनी, आणि समुद्रमंथनात विघ्न पडू नये यामुळे देवांनी देखील हे व्रत केले होते.