सातारा: अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविकांनी गेल्या दोन दिवसापासून संप पुकारला आहे. त्यामुळे रोज शाळेचा लळा लागलेली बालके हिरमुसून गेली आहेत. त्यांना खेळण्याच्या साहित्यासह मनमुराद बागडण्यास मिळत होते. तसेच पूरक आहारही अंगणवाडीत मिळत होता. मात्र, आता हे सर्व बंद असल्याने पालकांचेही संप कधी मिटतोय याकडे डोळे लागले आहेत.
अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांच्या मानधनात भरीव वाढ, मराठीतून पोषण ट्रॅकर ॲप, ग्रॅच्युइटी आदी मागण्यांसाठी जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस सोमवारपासून बेमुदत संपावर गेल्या आहेत. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील ४ हजार ५१२ अंगणवाड्यांना टाळे लागले आहेत.

अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांबाबत शासनाकडून कोणतीही कार्यवाही न झाल्याने हा संप सुरू केला आहे. सोमवारी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद कार्यालयासमोर विविध संघटनांनी संपाबाबत आंदोलने केली. संपात सातारा जिल्ह्यातील ३ हजार ५८४ अंगणवाडी सेविका, ७८९ मिनी अंगणवाडी सेविका, ३ हजार २६० मदतनीस सहभागी झाल्या आहेत. सातारा तालुक्यातील ५९३, कराड ७१२, पाटण ७४७ कोरेगाव ४०२, वाई ८०, जावली २८५, महाबळेश्वर १३७, माण ४३९, खटाव ४७९, खंडाळा ४७९, फलटण अंगणवाडीत ४२२ असे मिळून ४ हजार ५१२ अंगणवाड्यांना टाळे लागले आहेत.