NEP: पहिलीच्या विद्यार्थ्यांच्या वयासंदर्भात केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना निर्देश दिले आहेत. त्यानुसार इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी किमान वय ६ वर्षे निश्चित करण्यात येत आहे. अधिकाऱ्यांनी नुकतीच यासंदर्भात माहिती दिली.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार वयाची सुरुवातीची पाच वर्षे हा शिक्षणाचा मूलभूत टप्पा आहे. ज्यामध्ये तीन वर्षांचे प्री स्कूल शिक्षण आणि त्यानंतर वर्ग-१ आणि वर्ग २ यांचा समावेश होतो.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार वयाची सुरुवातीची पाच वर्षे हा शिक्षणाचा मूलभूत टप्पा आहे. ज्यामध्ये तीन वर्षांचे प्री स्कूल शिक्षण आणि त्यानंतर वर्ग-१ आणि वर्ग २ यांचा समावेश होतो.
शिक्षण मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, नवीन शैक्षणिक धोरण प्री-स्कूलपासून ते इयत्ता दुसरी पर्यंतच्या मुलांचे अखंड शिक्षण आणि विकासाला प्रोत्साहन देते. अंगणवाड्या, सरकारी अनुदानित, खासगी आणि एनजीओ शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांना तीन वर्षांचे दर्जेदार प्री-स्कूल शिक्षण मिळण्याची खात्री मिळाल्यानंतर या निर्णयाला महत्व प्राप्त होऊ शकते.
केंद्रीय मंत्रालयाने राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेश प्रशासनांना पहिलीच्या प्रवेशासाठी वयाच्या धोरणात आवश्यक बदल करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार सहा वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या मुलांना इयत्ता पहिलीत प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती अधिकार्याने दिली.