हायलाइट्स:
- राज्यपाल कोश्यारी आणि महाविकास आघाडी पुन्हा आमनेसामने
- नवाब मलिक यांच्यानंतर आता संजय राऊतांची राज्यपालांवर टीका
- भाजप राज्यपालांच्या माध्यमातून सत्ता राबवत असल्याचा आरोप
मुंबई: महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व महाविकास आघाडी सरकार पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. कोश्यारी यांचा तीन दिवसीय मराठवाडा दौरा त्यासाठी कारण ठरला आहे. राज्यपाल राज्य सरकारच्या कामात हस्तक्षेप करून समांतर सत्ताकेंद्र चालवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप महाविकास आघाडीनं केला आहे. त्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांवर खोचक टीका केली आहे. (Sanjay Raut taunts Bhagat Singh Koshyari)
वाचा:मोठी बातमी! लोकल ट्रेन सुरू करण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत
राज्यपाल कोश्यारी हे आजपासून पुढचे तीन दिवस मराठवाडा दौऱ्यावर आहेत. तिथं जिल्हाधिकारी कार्यालयात बैठका घेऊन ते प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेणार आहेत. राज्यपालांच्या या दौऱ्याला महाविकास आघाडीनं तीव्र आक्षेप घेतला आहे. नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. मुख्य सचिवांच्या मार्फत राज्यपालांना काही गोष्टींबाबत अवगत करण्याचा निर्णयही घेण्यात आला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी राज्यपालांच्या भूमिकेवर टीकाही केली होती. ‘आपण आता मुख्यमंत्री नाही, हे राज्यपाल कोश्यारी यांनी विसरू नये,’ असा टोला मलिक यांनी हाणला होता. या टीकेनंतरही राज्यपाल आजपासून दौऱ्यावर गेले आहेत.
वाचा: तीन महिने वापरात असलेल्या वास्तूचे मुख्यमंत्र्यांकडून उद्घाटन?
त्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना खासदार संजय राऊत यांनी भाजप व कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘ज्या राज्यांत भाजपची सरकारं नाहीत, तिथं राज्यपालांच्या माध्यमातून सरकार चालवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. दिल्लीतही हेच सुरू आहे. पश्चिम बंगालचे राज्यपालही त्याच पद्धतीनं काम करताहेत आणि महाराष्ट्राचे राज्यपालही दुडूदुडू धावत आहे. त्यांना धावू द्या, दम लागून पडतील,’ असा टोला राऊत यांनी हाणला.
वाचा: ‘राजकारण तुम्ही करताय, मी नाही’, राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची उपरोधिक टीका
Source link
‘आपले राज्यपाल दुडूदुडू धावताहेत; त्यांना धावू द्या, दम लागून पडतील’