Jio आणि Airtel ला घाम फोडणारा BSNL चा प्लान, १३ महिन्याची वैधता, फ्री डेटा आणि कॉलिंग

नवी दिल्लीः टेलिकॉम कंपनी बीएसएनएल कडून अनेक रिचार्ज प्लान आणले गेले आहेत. यात काही प्लानची वैधता मोठी आहे. या प्लानमध्ये वर्षभराची वैधता दिली जाते. सोबत फ्री डेटा आणि कॉलिंगची सुविधा दिली जाते. या प्लानचा मंथली खर्च ३०० रुपयापेक्षा कमी आहे. याचाच अर्थ बीएसएनएलचा वार्षिक प्लानचा मंथली खर्च जिओ आणि एअरटेलच्या मंथली प्लानपेक्षा कमी आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका प्लान संबंधी माहिती देत आहोत. जाणून घ्या डिटेल्स.

BSNL चा २९९९ रुपयाचा प्लान
बीएसएनएलच्या या प्लानमध्ये ३९५ दिवसाची वैधता मिळते. हा प्लान डेली २ जीबी डेटा लिमिट सोबत येतो. सोबत ७५ जीबी एक्स्ट्रा डेटा दिला जात आहे. याप्रमाणे यात एकूण ८६५ जीबी डेटा दिला जातो. या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग सोबत डेली १०० एसएमएसची सुविधा दिली जाते. सोबत PRBT आणि Eros Now चे मंथली सब्सक्रिप्शन मिळते.

वाचाः iPhone 14 ला ४४,९९९ रुपयात खरेदीची संधी, २८ हजारात iPhone 12, iPhone 13 वर काय डील?, पाहा

BSNL 2399 Plan
हा प्लान ३६५ दिवस म्हणजेच संपूर्ण वर्षभराची वैधता मिळते. सोबत डेली २ जीबी डेटा ऑफर केला जातो. याशिवाय, फ्री मध्ये अनलिमिटेड व्हाइस कॉलिंगची सुविधा दिली जाते. या प्लानमध्ये यूजर्सला डेली १०० एसएमएस मिळते. सोबत ७४ जीबी एक्स्ट्रा डेटा मिळतो. यात एकूण ८०२ जीबी डेटा मिळतो.

वाचाः HP ने भारतात लाँच केला पॉवरफुल गेमिंग लॅपटॉप OMEN 17, पाहा किंमत-फीचर्स

BSNL 1198 Plan
या प्लानमध्ये ३ जीबी मंथली डेटा मिळतो. कॉलिंगसाठी ३०० मिनिट आणि ३० एसएमएस दिले जाते. या प्लानची वैधता ३६५ दिवसाची आहे.

नोटः
बीएसएनएलचे हे सर्व वार्षिक रिचार्ज प्लान आहे. जे ३६५ दिवस किंवा त्यापेक्षा जास्त वैधता मिळत. परंतु, याचा मंथली खर्च ३०० रुपयांपेक्षा कमी आहे. हे सर्व रिचार्ज प्लान १ हजार रुपये किंवा त्यापेक्षा जास्त किंमती सोबत येतात.

वाचाः Free मध्ये IPL दाखवून जिओ कमावणार कोट्यवधी रुपये, कसं ते जाणून घ्या

Source link

Bsnl Annual PlanBsnl Annual Plan 2023bsnl annual plansBsnl Annual Plans 2023Bsnl Planbsnl plans
Comments (0)
Add Comment