हायलाइट्स:
- करोनाच्या भीतीने मुलींनी ३ दिवस वडिलांचा मृतदेह घरीच ठेवला
- नंतर एका मुलीची आत्महत्या तर…
- तर दुसरी मुलगी थोडक्यात बाचवली
ठाणे : महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्याच्या विरारमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. करोना व्हायरसच्या (Coronavirus Fear) तपासणीच्या भीतीने मुलींनी वृद्ध वडिलांचा मृतदेह (Father Dead body)तीन दिवस घरात ठेवला. या दरम्यान, एका मुलीने आत्महत्या केली (Daughter Committed Suicide) , तर दुसऱ्या मुलीने जीव देण्याचा प्रयत्न केला खरा पण ती वाचवी. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या मुलींना भीती वाटते होती की त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांची चौकशी केली जाईल आणि करोना संसर्ग झाल्यास त्यांना क्वारंटाईन (Quarantine) ठेवलं जाईल.
अरनाला सगरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजू माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, विरारच्या गोकुळ शहरातील त्यांच्या घरातून बुधवारी निवृत्त रेशन अधिकारी हरिदास सहारकर यांचा विकृत मृतदेह सापडला. सहारकर यांची धाकटी मुलगी स्वप्नालीने आदल्या दिवशी नवापूरमध्ये समुद्रात उडी मारत आत्महत्या केली. त्यानंतर ही धक्कादायक बाब उघड झाली.
करोनाचा होण्याची भीती होती
ते म्हणाले की, तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, सहारकर यांचा रविवारी घरी मृत्यू झाला होता. त्यानंतर कुटुंबाने त्यांचा मृतदेह घरीच ठेवला कारण त्यांना करोनाची लागण होण्याची भीती होती आणि नंतर त्यांना अलग ठेवलं जाईल यामुळे मुली घाबरल्या होत्या. ते म्हणाले की, मृत व्यक्तीच्या मोठ्या मुलीने नवापूरमध्ये समुद्रात उडी मारून आत्महत्या केली आणि तिचा मृतदेह पोलिसांनी मंगळवारी बाहेर काढला.
लहान मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न
यानंतर लहान मुलीने अशाच प्रकारे आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला पण ती वाचली. पोलीस सुरुवातीला आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणाची चौकशी करत होते आणि आता दोन अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणाचा पोलीस तपास करत असून मृतदेह शवविच्छेदनासाठी ताब्यात घेण्यात आले आहे. तर मोठ्या मुलीची पोलीस चौकशी करत असल्याची माहिती देण्यात आली आहे.