पेन्शन न मिळाल्याने नैराश्य; निवृत्त कर्मचाऱ्याने पालिकेतच अंगावर पेट्रोल ओतून घेतले

हायलाइट्स:

  • इचलकरंजी नगरपालिकेच्या निवृत्त कर्मचाऱ्याने पालिकेतच अंगावर पेट्रोल ओतून घेतले.
  • काडीपेटीतून काडी काढत तो पेटवून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न.
  • काही महिन्यापूर्वीच सामाजिक कार्यकर्ते संजय भोरे याने पालिकेत पेटवून घेऊन आत्महत्या केली होती.

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सतत पाठपुरावा करूनही वैद्यकीय बिल आणि पेन्शन न मिळाल्याने निराश झालेल्या इचलकरंजी नगरपालिकेच्या निवृत्त कर्मचाऱ्याने पालिकेतच अंगावर पेट्रोल ओतून घेतले. काडीपेटीतून काडी काढत तो पेटवून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत असतानाच नगरसेवकांसह काहींनी वाचविले. यामुळे मात्र नगरपालिकेत एकच खळबळ उडाली. कारण काही महिन्यापूर्वीच सामाजिक कार्यकर्ते संजय भोरे याने पालिकेत पेटवून घेऊन आत्महत्या केली होती. (A retired employee of the municipality pours petrol on his body in the municipality)

इचलकरंजी येथील नारायण लगोटे हा काही महिन्यापूर्वी पालिकेच्या सेवेतून निवृत्त झाला. कामावर असताना त्याने उपचारावर खर्च केलेली लाखापेक्षा अधिक रक्कम तसेच पेन्शन मिळण्यासाठी तो पाठपुरावा करत होता. पण ते मिळत नव्हते. त्याला उपचारासाठी आणखी रक्कम हवी होती.त्यासाठी पेन्शनची रक्कम तातडीने मिळावे म्हणून तो पालिकेत हेलपाटे मारत होता. मात्र, ते मिळत नसल्याने निराश झालेल्या लगोटेने सकाळी पालिकेच्या दारातच अंगावर पेट्रोल ओतून घेतले. पेटवून घेण्याचा प्रयत्न करत असतानाच पाणी पुरवठा समितीचे सभापती विठ्ठल चोपडे, युवराज शिंगाडे, विजर रवंदे, रणजीत शिंगाडे यांनी त्याला वाचवले. यामुळे अनर्थ टळला.

क्लिक करा आणि वाचा- ‘कोण अमृता फडणवीस?’; महापौर किशोरी पेडणेकर यांचे प्रत्युत्तर

काही महिन्यापूर्वी याच पालिकेत सामाजिक कार्यकर्ते भोरे याने पेटवून घेऊन आत्महत्या केली होती. यामुळे लगोटे याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली. याबाबत शिवाजीनगर पोलिसांनी लगोटे यास ताब्यात घेतले आहे.

क्लिक करा आणि वाचा- प्रतीक्षा संपली; यंदा म्हाडाची सर्वसामान्यांसाठी ९००० घरांची लॉटरी
क्लिक करा आणि वाचा- राज्यातील ‘या’ चार जिल्ह्यांमध्ये करोनाची स्थिती चिंताजनक; आरोग्य विभागाची ‘ही’ सूचना

Source link

A retired employee of the municipalityattempt to suicideIchalkaranjiआत्महत्येचा प्रयत्ननिवृत्त कर्मचारीनैराश्यपेन्शन
Comments (0)
Add Comment