बॅंक ऑफ बडोदाच्या पदभरतीअंतर्गत एकूण ५०० पदे भरली जाणार आहेत. देशातील विविध जिल्ह्यांमध्ये ही भरती केली जाणार आहे. यानुसार सामान्य श्रेणीतील २०३, एससीची ७५, एसटीची ३७, ओबीसीची १३५ आणि इडब्ल्यूएसची ५० पदे भरली जाणार आहेत.
एससी, एसटी आणि दिव्यांग उमेदवार आणि महिला उमेदवारांना अर्जासाठी १०० रुपये भरावे लागतील. ईडब्ल्यूएस, ओबीसी आणि सामान्य श्रेणीतील उमेदवारांना ६०० रुपये शुल्क भरावे लागेल. लेखी चाचणी, गटचर्चा आणि मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
BOB Job: असा करा अर्ज
सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट bankofbaroda.co.in वर जा.
त्यानंतर रिक्रूटमेंट विभागात जा.
अधिग्रहण अधिकारी लिंकवर क्लिक करा.
ईमेल आयडी आणि फोन नंबर टाकून यूजर आयडी तयार करा.
त्यानंतर फॉर्म भरा आणि संबंधित कागदपत्रे अपलोड करा.
अर्ज शुल्क भरा आणि अंतिम सबमिट बटणावर क्लिक करा.
फॉर्मची एक प्रत डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी ती तुमच्याकडे ठेवा.
पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे.
या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. तसेच उमेदवारांना संबंधित संस्थेने दिलेल्या अटी आणि शर्थींचे पालन करणे आवश्यक आहे.
या रिक्त पदांसाठी २२ फेब्रुवारी २०२३ पासून अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून १४ मार्च ही ऑनलाइन अर्ज करण्याची आणि ऑनलाइन फी भरण्याची शेवटची तारीख आहे. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया अंतिम तारखेनंतर बंद केली जाईल. त्यामुळे उमेदवारांना नियोजित तारखेपूर्वी अर्ज करण्याचा सल्ला दिला जातो. तसेच, उमेदवारांनी फॉर्म भरण्यासाठी शेवटच्या तारखेची वाट पाहू नये. कारण शेवटच्या तारखेला अनेकदा वेबसाईट डाउन होते आणि फॉर्म भरण्यात अडचणी येतात.
पदभरतीचा तपशील पाहण्यासाठी येथे क्लिक करा