अधिक मास २०२३: १९ वर्षानंतर जुळून येतोय श्रावण महिन्यात असा संयोग, रक्षाबंधन सणावर होईल परिणाम

एका वर्षात १२ महिने असतात, पण या वर्षी हिंदू पंचांगानुसार असा योगायोग आहे की, यावेळी कॅलेंडरमध्ये १२ ऐवजी १३ महिने असतील. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून असे म्हटले जाते की, जेव्हा हे घडते तेव्हा ते शुभ नसते. चला तर वैदिक ज्योतिष तज्ज्ञ पंडित राकेश झा यांच्याकडून जाणून घेऊया की या वर्षी १३वा महिना कधी असेल आणि कोणत्या महिन्यात हा १३वा अधिक महिना असेल. तसेच जाणून घेऊया अधिक महिन्याचे वैशिष्ट्य, महत्त्व, रहस्य आणि याचा कसा परिणाम होईल.

श्रावन महिना ५९ दिवसांचा

अधिक महिन्याला विविध नावांनी संबोधले जाते. त्याला मलमास, पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. योगायोग असा झाला आहे की, श्रावण महिन्यात अधिक महिना आला आहे. त्यामुळे यावेळी श्रावण महिना ५९ दिवसांचा असेल. असे होईल कारण या वर्षी दोन महिने श्रावणाचे मानले जातील. अशा स्थितीत अधिक मास असणार्‍या श्रावण महिन्याच्या पहिल्या महिन्यात श्रावणाशी संबंधित शुभ कार्ये होणार नाहीत. सर्व धार्मिक व शुभ कार्ये श्रावण महिन्याच्या दुसऱ्या महिन्यात म्हणजेच शुद्ध श्रावण महिन्यात होतील.

Rahu Mahadasha: राहू वाढवेल डोक्याचा ताण, ‘या’ राशीच्या जीवनावर पडेल अशुभ प्रभाव

यामुळे ३ वर्षानंतर येतो ५९ दिवसांचा अधिक महिना

ज्योतिषीय गणनेनुसार, सौर वर्ष ३६५ दिवस, ६ तास आणि ११ सेकंदाचे असते. पण चांद्रवर्ष ३५४ दिवस आणि ९ तासांचे असते. अशा स्थितीत, दरवर्षी चांद्र वर्षात सौर वर्षापासून सुमारे ११ दिवसांचा फरक असतो. अशा स्थितीत सौर वर्ष आणि चांद्र वर्षाचा ताळमेळ राखण्यासाठी एका मलमासानंतर दुसरा मलमास ३२ महिने, १६ दिवसांनी पुन्हा येतो. अशाप्रकारे दर तिसऱ्या वर्षी अधिक मास होतो. असाच योगायोग तब्बल १९ वर्षांनंतर या वेळी श्रावण महिन्यात घडला आहे. त्यामुळे या वर्षी श्रावण महिन्यात अधिक मास होणार आहे.

अधिक महिना किती तारखेपासून ते किती तारखेपर्यंत

या वर्षी मंगळवार, १८ जुलैपासून अधिक मास सुरू होईल आणि १६ ऑगस्ट रोजी संपेल. चांगली गोष्ट म्हणजे अधिकमास सुरू होण्याआधीच १५ जुलैला श्रावण शिवरात्री संपेल, पण रक्षाबंधनाला बराच काळ वाट पाहावी लागणार आहे. साधारणत: रक्षाबंधनाचा सण श्रावण शिवरात्रीच्या १५ दिवसांनीच साजरा केला जातो, मात्र अधिकमास सुरू झाल्यामुळे श्रावण शिवरात्री आणि रक्षाबंधन यात ४६ दिवसांचे अंतर राहील.

March 2023 मार्च महिन्यात ग्रहांचे राशीपरिवर्तन: ‘या’ राशींना बसेल फटका, लक्ष्मी जाईल घराबाहेर

श्रावण महिन्यात अधिक मास आल्याचा प्रभाव

वर्ष प्रबोध नावाच्या मेदिनी ज्योतिषशास्त्राच्या पुस्तकात ‘अधिकामास फलम्’ या अध्यायातील श्लोक क्रमांक ४ मध्ये श्रावण महिन्यात जास्तीचा महिना असेल तर पावसाळ्यात अडथळा निर्माण होऊन लोकांच्या संपत्तीची हानी होईल असे भाकीत केले आहे. यावर्षी पावसाळ्यात अधिकमासादरम्यान, मंगळ सूर्याच्या पुढे भ्रमण करेल, जो असामान्य पावसाचा योग आहे. सूर्य आणि बुध कर्क राशीत भ्रमण करणार आहेत, ज्यामुळे मंगळ आणि शुक्र पुढील राशीत सिंह राशीत प्रवेश करतील, तसेच गुरू मेष राशीत आणि शनि कुंभ राशीत असेल, अशा स्थितीत जुलैच्या मध्यापासून ऑगस्टच्या मध्यभागी असमान्य पावसामुळे पूरस्थिती निर्माण होईल. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. या कालावधीत बिहार, उत्तर प्रदेश, आसाम आणि बंगालमध्ये कमी पाऊस पडेल तर मध्य भारत, गुजरात, राजस्थान आणि महाराष्ट्रात जास्त पाऊस पडेल. आग, विमान अपघात, युद्ध आणि नैसर्गिक आपत्तींमुळे जनतेला आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. रशिया, चीन, तैवान, युक्रेन, पाकिस्तान आणि युरोपीय देशांमध्ये मोठी उलथापालथ होऊ शकते.
फाल्गुन महिन्याला धार्मिक महत्व, जाणून घ्या कसे पडले हे नाव

Source link

adhik mahina 2023adhik mahina mysteryadhik mahina significance in marathiMalmaas 2023purushottam maas dateshravan 2023अधिक महिना 2023अधिक महिन्याचे महत्वपुरुषोत्तम मास महत्वमलमास
Comments (0)
Add Comment