Holi 2023 होळीः होलाष्टक म्हणजे काय? ते अशुभ का मानले जाते?

होलाष्टक म्हणजे होळीचे आठ दिवस. होलिका दहनाच्या आठ दिवस आधीपासून होलाष्टक सुरू होते. फाल्गुन शुद्ध अष्टमीपासून सुरू झालेले होलाष्टक होलिकादहनापर्यंत सुरू राहते. यामुळे आजपासून होलाष्टक प्रारंभ झाला असून, धर्मशास्त्रात वर्णन केलेले १६ संस्कार या होलाष्टकाच्या कालावधीत केले जात नाही. कोणत्याही कार्याचा शुभारंभ करणे किंवा १६ संस्कार करणे या कालावधीत अशुभ मानले जाते.

होलाष्टकाची परंपरा


होलाष्टक सुरू झाल्यापासून रस्त्यांवर ठिकठिकाणी परंपरा स्वरूप होलिका दहन केले जाते. तेथे गंगाजल शिंपडून प्रतीक म्हणून दोन लाकडाच्या काठ्या स्थापित केल्या जातात. एक काठी होलिका आणि दुसरी काठी भक्त प्रल्हाद स्वरुप मानली जाते. यानंतर येथे लाकूड आणि कंडे लावले जातात. याचे होळीच्या दिवशी दहन केले जाते, यालाच होलिका दहन म्हणतात.

अधिक मास २०२३: १९ वर्षानंतर जुळून येतोय श्रावण महिन्यात असा संयोग, रक्षाबंधन सणावर होईल परिणाम

होलाष्टक अशुभ का मानले जाते?

ज्योतिष शास्त्राप्रमाणे, होलाष्टकच्या प्रथम दिवशी अर्थात फाल्गुन शुद्ध अष्टमीला चंद्र, नवमीला सूर्य, दशमीला शनी, एकादशीला शुक्र, द्वादशीला गुरु, त्रयोदशीला बुध, चतुर्दशीला मंगळ आणि पौर्णिमेला राहु हे ग्रह उग्र स्वरुपात असतात. या ग्रहांचा प्रभाव मानवावर पडल्यामुळे मस्तिष्काचे सर्व विकार, शंका आणि द्विधा मनस्थिती यांमुळे माणूस चिडचिडा होत असतो. मन अशांत राहते. अडचणी, समस्या निर्माण होतात. याचा परिणाम हातात घेतलेल्या कार्यांवर होतो आणि त्यात यश मिळण्याऐवजी अपयश येते. घरात नकारात्मकता, अशांती, दुःख आणि क्लेशदायक वातावरण तयार होते. सदर गोष्टींमुळे होळीपूर्वीचे आठ दिवस अशुभ मानले जातात.

Holi 2023: होळी कोणत्या तारखेला आहे ? पाहा होलिका दहनाची योग्य तिथी आणि मुहूर्त

१६ संस्कार कोणते?

गर्भाधान, विवाह, गर्भाधारणाच्या तिसर्‍या महिन्यात करण्यात येणारे संस्कार, नामकरण, चूडाकरण, विद्यारंभ, गृह प्रवेश, गृह निर्माण, गृह शांती, हवन-यज्ञ कर्म आदी संस्कार या होलाष्टकाच्या कालावधीत करू नयेत, असे सांगितले जाते.

Gudhi Padwa 2023 : हिंदू नववर्ष २२ मार्चपासून ‘या’ राशींचे उजळेल नशीब, भाग्योदयाचा उत्तम काळ

Source link

date and time of holashtakHolashtak 2023Holika Dahan 2023 Date And TimeHolika Dahan Timingwhat is holashtakहोलाष्टकहोलाष्टक 2023होलाष्टक २०२३होळी१६ संस्कार
Comments (0)
Add Comment