covid relief package: लोककलावंतांसाठी मोठा निर्णय; सरकार देणार एकरकमी कोविड दिलासा पॅकेज

मुंबई: कोविडमुळे आलल्या आर्थिक संकटाला तोंड देणाऱ्या राज्यातील लोककलावंतांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. राज्यातील शेकडो लोककलावंत,लोक कलाकार, लोककला पथकांचे चालक, मालक, निर्माते यांना कोवीड आर्थिक संकटाला मोठे तोंड द्यावे लागले. या विचार करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या लोककलावंतांना एकरकमी कोविड दिलासा पॅकेज देण्याचा निर्णय घेतला आहे. (state govt to give covid relief package for folk artists in state who are facing financial crisis)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्यासमवेत एक बैठक घेतली. यात मुख्यमंत्र्यांनी कलाकारांसाठी एक रकमी कोविड दिलासा पॅकेज देण्यास मान्यता दिली असून यासंदर्भात विस्तृत प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळासमोर लगेच आणावा असे निर्देश दिले आहेत. यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देखील सांस्कृतिक कार्यमंत्री देशमुख यांची एक बैठक झाली होती.

क्लिक करा आणि वाचा- करोना: राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये दैनंदिन रुग्ण वाढले; पाहा, ‘अशी’ आहे स्थिती!

गेल्या दीड वर्षापासून महाराष्ट्र कोविड संसर्गाशी लढा देत आहे. राज्यातील कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्यात सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली असल्याने अनेक कलाकारांवर आर्थिक संकट ओढवले आहे. हे लक्षात घेऊन राज्यातील ५६ हजार कलाकारांना प्रत्येकी ५ हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज घोषणा केली.

क्लिक करा आणि वाचा- सर्वसामान्यांसाठी खूशखबर! म्हाडाची कोकण विभागासाठी ८,२०५ घरांची बंपर सोडत

५६ हजार कलाकारांना प्रत्येकी ५ हजार रुपयांची मदत

राज्यात सध्या मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे आणि पुणे येथे जवळपास ८ हजार कलाकार असून, राज्यात उर्वरित जिल्हयात जवळपास ४८ हजार कलाकार आहेत. या सर्व कलाकारांना प्रती कलाकार ५ हजार रुपये मदत देण्यात येणार असून यासाठी जवळपास २८ कोटी रुपये खर्च होणार आहे.

क्लिक करा आणि वाचा- भाजप-मनसे युती होणार?; उद्या चंद्रकांत पाटील घेणार राज ठाकरेंची भेट

समूह लोककलापथकांचे चालक मालक आणि निर्माते यांनाही एकरकमी विशेष कोविड अनुदान पॅकेज

राज्यात प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रात विविध कलापथके कार्यरत आहेत. कोविडमुळे वर्षभरात प्रयोग न झाल्याने त्यांच्यापुढे आर्थि संकट उभे असून शाहिरी, खडीगंमत, संगीतबारी, तमाशा फड पूर्णवेळ, तमाशा फड- हंगामी,दशावतार, नाटक, झाडीपट्टी, विधीनाट्य, सर्कस आणि टुरींग टॉकीज अशा जवळपास ८४७ संस्थांतील कलाकारांना मदत करण्यात येणार असून यासाठी ६ कोटी रुपये खर्च होणार आहे. याशिवाय राज्यातील कलाकारांचे सर्वेक्षण, कलाकार निवड आणि इतर अनुषंगिक खर्च यासाठी १ कोटी रुपये खर्च होणार असल्याचे सांस्कृतिक मंत्री देशमुख यांनी सांगितले.

Source link

cm uddhav thackeraycovid relief packagefinancial crisisrelief package for folk artistsकोविड दिलासा पॅकेजमुख्यमंत्री उद्धव ठाकरेलोककलावंत
Comments (0)
Add Comment