एका लीक रिपोर्टनुसार, Vivo V27 Pro ला भारतात तीन रॅम आणि स्टोरेज व्हेरियंट मध्ये आणले जाणार आहे. ज्यात ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज, ८ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेज आणि १२ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेज व्हेरियंट मध्ये आणले जाणार आहे. बेस व्हेरियंटची किंमत ३७ हजार ९९९ रुपये आहे. तर टॉप व्हेरियंटची किंमत ४२ हजार ९९९ रुपये किंमतीत लाँच केले जावू शकते.
वाचाः Nokia ने ६० वर्षानंतर आपला लोगो बदलला, लोगो आणि कलर संबंधी जाणून घ्या
फ्लिपकार्टवरील लिस्टिंग नुसार, Vivo V27 Pro ला ३डी कर्व्ड डिस्प्ले आणि अल्ट्रा स्लिम डिझाइन सोबत आणले जावू शकते. Vivo V27 Pro केवळ 7.4mm स्लीम असेल. या सोबत १२० एचझेड रिफ्रेश रेट मिळेल. फोन सोबत रंग बदलणारा बॅक पॅनेल सुद्धा मिळेल. Vivo V27 Pro सोबत तीन रियर कॅमेरे असतील ज्यात रिंग एलईडी फ्लॅश लाइट असेल. फोनमध्ये प्रायमरी लेन्स ५० मेगापिक्सलचा Sony IMX766V सेंसर असेल. यासोबत OIS चा सपोर्ट मिळेल. Vivo V27 Pro ला मॅजिक ब्लू आणि नोबल ब्लॅक कलर मध्ये आणले जाणार आहे. या फोनमध्ये मीडियाटेक Dimensity 8200 प्रोसेसर सोबत अँड्रॉयड १३ मिळू शकतो.
वाचाः MWC 2023 : जगातील सर्वात मोठा टेक शो आजपासून, जाणून घ्या डिटेल्स
वाचाः Samsung Galaxy S22 ला अर्ध्या किंमतीत खरेदीची संधी, पाहा डिस्काउंट ऑफर