अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूलमध्ये ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा

मराठी भाषा गौरव दिन
पुणे:आज दिनांक २७ फेब्रुवारी २०२३ रोजी अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूलमध्ये ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा करण्यात आला.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर उज्ज्वला हातांगळे उपस्थित होत्या.कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रशालेचे प्राचार्य श्री राज मुजावर यांनी प्रमुख पाहुण्यांचे यथोचित स्वागत केले व कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.याप्रसंगी प्र. पाहुण्यांनी विद्यार्थ्यांस मराठी भाषा,कवी कुसुमाग्रज यांचे साहित्यिक योगदान याविषयी यथोचित मार्गदर्शन केले.प्रशालेतील निवडक विद्यार्थ्यांनी काही दर्जेदार कविता सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढवली. प्रशालेचे मराठी भाषा विभागप्रमुख श्री नितिन तोडकर व इंग्रजी भाषा प्रमुख सौ शबाना शेख यांनी कविता सादर केल्या.या कार्यक्रमास गणित विभाग प्रमुख श्री मुनाफ पागां ,मराठी भाषा अध्यापक श्री अताउल्लाह सर उपस्थित होते.या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेचे मराठी भाषा अध्यापक श्री राजेंद्र पवार सर यांनी केले.कार्यक्रमाची शेवटी मराठी भाषा विभाग प्रमुख सौ रईसा सुंडके यांनी सर्वांचे आभार मानले.

Comments (0)
Add Comment