वारंवार अपयशानंतर यश
हॅपिलोचे सह-संस्थापक विकास डी नहार हे शार्क टॅक्स इंडिया सीझन २ मध्ये गेस्ट शार्क म्हणून सामील होत आहेत. त्यांनी आपल्या इंट्रोच्या व्हिडिओमध्ये स्वत:बद्दल माहिती आहे. वारंवार अपयशी झाल्यानंतरही धैर्य कसे हारले नाही हे त्यांनी यावेळी सांगितले. नाहर यांची कंपनी हॅपिलो पश्तिक स्नॅक्स खास ड्रायफ्रुट्स बनवते. कंपनीने वेगाने वाढ केली. आजच्या तारखेत त्यांच्या कंपनीची एकूण संपत्ती ५०० कोटींच्या जवळ पोहोचली आहे. मात्र, हे यश त्यांना सहजासहजी मिळाले नाही. कंपनीला इथपर्यंत नेणाऱ्या नहार यांनी २० वेळा अपयशाचे दु:ख सोसले आहे.
मी वारंवार प्रयत्न केले आणि हेच माझ्या यशाचे रहस्य असल्याचे नहार सांगतात. नहार यांनी अवघ्या १० हजार रुपयांमध्ये हॅपिलो कंपनी सुरू केली. त्याचं्या कंपनीत फक्त दोनच लोक होते. आज ही कंपनी ५०० कोटी रुपयांची आहे. हॅपिलोची उत्पादने तुम्हाला ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर, देशातील छोट्या-मोठ्या स्टोअरमध्ये सहज मिळतात.
विकास डी नहार हे शेतकरी कुटुंबातील आहेत. त्यांनी बंगळुरू विद्यापीठातून कॉम्प्युटर सायन्समध्ये पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात जैन ग्रुपमधून केली. कामासोबतच त्यांनी एमबीए केले. यासह, त्यांनी अन्न उद्योगात काम करण्यास सुरुवात केली. २०१६ मध्ये, त्यांनी हेल्दी स्नॅक्स उत्पादनासह हॅपीलो सुरू केले. ४० प्रकारचे ड्रायफ्रुट्स, १०० प्रकारचे चॉकलेट्स, ६० प्रकारचे व्हेरिअंटसह त्यांची कंपनी आजच्या तारखेत ५०० कोटींची झाली आहे.