HSC Exam: कॉम्युटर टेक्नोलॉजीची प्रश्नपत्रिका मराठीऐवजी इंग्रजीतून,अनुवाद करण्यात गेला विद्यार्थ्यांचा वेळ

HSC Exam: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. या परीक्षेमध्ये पहिल्याच दिवसांपासून गोंधळ पाहायला मिळत आहे. कधी प्रश्न पत्रिकेत उत्तरच छापून आली तर कुठे प्रश्नपत्रिकांमध्ये अनेक चुका आल्या. आता तर बीड जिल्ह्यामध्ये कॉम्प्युटर टेक्नोलॉजीचा पेपर मराठीतून देणाऱ्या विद्यार्थांना इंग्रजी भाषेतील प्रश्नपत्रिका देण्यात आली.

कॉम्पुटर टेक्नोलॉजीच्या पेपरमध्ये बोर्डाचा पुन्हा गोंधळ पाहायला मिळाला. मराठीमध्ये परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थींना मराठीतूनच प्रश्नपत्रिका येणे अपेक्षित असताना चक्क इंग्रजीमध्ये प्रश्नपत्रिका आली. त्यामुळे या प्रश्नांचे भाषांतर करून मुलांना प्रश्न मराठीत करून देण्याची वेळ परीक्षा केंद्रावरील शिक्षकांवर आली. प्रश्नाचा मराठीत अनुवाद केल्यानंतर या केंद्रावरील विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.

इंग्रजी भाषेतील प्रश्नपत्रिका पाहून मराठी भाषेमध्ये परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. मराठीमध्ये परीक्षा देणाऱ्या मुलांच्या हाती इंग्रजीतील प्रश्नपत्रिका पत्रिका पडल्यामुळे विद्यार्थी चांगलेच बुचकळ्यात पडले.

या गोंधळात विद्यार्थ्यांचा इंग्रजी पेपर ट्रान्सलेट करून मराठीत करण्यात विद्यार्थ्यांचा अर्धा तास गेला. या सगळ्या प्रकाराला नेमकं जबाबदार कोण? हा देखील प्रश्नचिन्ह उभा राहत आहे

बीड जिल्ह्यातील अनेक परीक्षा केंद्रावर प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आधीच्या दोन पेपरमध्ये चुका होऊनही शिक्षण विभाग अजूनही गाफील असल्याची टिका होऊ लागली आहे.

Source link

Computer technologyHSC ExamHSC Exam PaperMaharashtra Timesइंग्रजीत प्रश्नपत्रिकाकॉम्प्युटर टेक्नोलॉजी पेपरबारावीबारावी कॉम्प्युटर टेक्नोलॉजी पेपरबारावी परीक्षाबारावीच्या परीक्षेत पुन्हा गोंधळमराठीमध्ये परीक्षा
Comments (0)
Add Comment