iPhone 15 पुढे iPhone 14 खूप फिका पडणार, फीचर्स पाहून प्रेमात पडाल

नवी दिल्लीःiPhone 15 यावर्षी लाँच करण्यात येणार आहे. त्यामुळे आता अशी माहिती समोर येत आहे की, टॉप अँड iPhone 15 Ultra खूप साऱ्या अपग्रेड सोबत लाँच करण्यात येणार आहे. यात पेसिस्कोप कॅमेरा, नवीन टायटेनियम फ्रेम डिझाइन, यूएसबी टाइप सी चार्जिंग पोर्ट, पॉवरफुल आणि नवीन A17 बायोनिक चिपसेट सह अनेक फीचर्स मिळणार आहे.

Appleच्या चाहत्यांना आयफोन १५ ची खूप उत्सूकता आहे. त्यांना आयफोन १४ च्या तुलनेत नवीन मॉडल्सकडून खूप अपेक्षा आहेत. एका रिपोर्टनुसार, iPhone 15 मध्ये iPhone 14 च्या तुलनेत मोठा डिस्प्ले दिला जावू शकतो. iPhone 14 आणि iPhone 14 Pro मध्ये ६.१ इंचाचा डिस्प्ले दिला आहे. तर रिपोर्टच्या माहितीनुसार, iPhone 15 नवीन साइज ६.२ इंचाच्या डिस्प्ले सोबत येवू शकते. परंतु, डिस्प्ले, रिझॉल्यूशन आणि रिफ्रेश रेट संबंधी अजून माहिती येणे बाकी आहे.

9 to 5 Mac ने हे रिविल केले आहे की, iPhone 15 मध्ये यावेळी नॉच डिझाइनला हटवले जावू शकते. सध्या डायनामिक आयलँड फीचर फक्त iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max मॉडल्समध्ये उपलब्ध आहे. परंतु, iPhone 15 मध्ये हे उपलब्ध केले जावू शकते.

वाचाः सरकारकडून आता आधार कार्डमध्ये हा बदल, पाहा काय परिणाम होणार?

याशिवाय, iPhone 15 मध्ये USB टाइप-सी चार्जिंग पोर्ट सुद्धा दिला जावू शकतो. लाइटनिंग पोर्टला आयफोनमधून पूर्णपणे हटवले जावू शकते. Apple ड्यूल कॅमेरा सेटअप आपल्या स्टँडर्ड फोन्समध्ये जारी ठेवले जाईल. आयफोन मॉडल्स पूर्णपणे टचवर जाईल. तर आयफोन १५ फिजिकल बटन्स सोबत येईल. ही सर्व डिटेल्स अजून कन्फर्म नाही. फक्त रिपोर्टवर आधारित आहे. आयफोन १५ चे फायनल स्पेसिफिकेशन आणि फीचर्स लाँचिंग नंतर उघड केले जातील.

वाचाः विजेविना चालणारा पंखा आला, किंमत फक्त ३६९ रुपये, फीचर्स पाहून दंग व्हाल

Source link

iphone 15iphone 15 featuresiphone 15 seriesiphone 15 specificationiphone 15 specsiphone 15 update
Comments (0)
Add Comment