Holi 2023 होळीः होलाष्टक म्हणजे काय? ते अशुभ का मानले जाते?
भद्रेचा होम
कोकणात होळीचा उत्सव महत्त्वाचा मानला जातो. फाल्गुन महिन्यात येणारा शिमगा शेतकरी वर्गाच्या निवांत काळात येतो. कोकणात विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात शिमगा सण मोठ्या प्रमाणात साजरा होतो. प्रथेप्रमाणे फाल्गुन पौर्णिमेला होळीचा मुख्य दिवस असतो. कोकणात हा सण सुमारे १५ दिवस साजरा केला जातो. कोकणात काही ठिकाणी पौर्णिमेच्या रात्री होम केला जातो, तर काही ठिकाणी पौर्णिमायुक्त प्रतिपदेला होम केला जातो; याला ‘भद्रेचा होम’ असे म्हणतात.
कोकण किनारपट्टीवरील शिमगा
कोकणाला लाभलेली समृद्ध किनारपट्टी आणि तिथे शतकानुशतके राहणारे कोळी बांधव शिमगा उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी आपापल्या होड्यांची पूजा करतात. होळीच्या दुसऱ्या दिवशी होडीवर जायचा मान घरातील स्त्रियांना दिला जातो. या दिवशी पूजेचे सामान, फळे, खाद्यपदार्थ असे सगळे सामान सोबत घेऊन पारंपरिक वेशात कोळी बांधव होडीवर जातात. पारंपरिक नृत्य, गाणी, एकत्र जेवण असा आनंदाचा उत्सव यावेळी साजरा केला जातो.
Holi 2023: होळी कोणत्या तारखेला आहे ? पाहा होलिका दहनाची योग्य तिथी आणि मुहूर्त
शिमगाचे वेगवेगळे खेळ
आगीतून पलायन, नारळ जिंकणे अशा स्पर्धा आजही शिमगा उत्सवात भरवल्या जातात. होळीच्या दिवसात ‘जती’च्या रूपात गायनाचा कार्यक्रम चालतो. धुलिवंदनाच्या दिवशी ओल्या मातीत लोळण घेण्याची प्रथा आजच्या काळातही सुरू आहे. शिमगा उत्सवात नृत्याचे सादरीकरण हमखास केले जाते. वेगवेगळी सोंगे धारण करून कलाकार लोकांचे मनोरंजन करताना दिसतात. काटखेळ, डेरानृत्य, गौरीचा नाच, चवळी नृत्य, जाखडी नृत्य, पुरुषमंडळीनी स्त्री वेश धारण करून केलेला तमाशा व त्यातील सवाल-जवाब, शंकासुर, नकटा यांसारखी सोंगे, असे विविध प्रकार यादरम्यान सादर केले जातात. लोकनृत्याला गीताची आणि वाद्यवादनाची पूरक साथ असते. पारंपरिक वेशभूषा करून ही नृत्ये सादर केली जातात.
Gudhi Padwa 2023 : हिंदू नववर्ष २२ मार्चपासून ‘या’ राशींचे उजळेल नशीब, भाग्योदयाचा उत्तम काळ