School Holiday: शालेय विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. विद्यार्थ्यांना मार्च महिन्यात मिळणाऱ्या सुट्ट्यांची यादी समोर आली आहे. त्यामुळे वार्षिक परिक्षा जवळ आली असताना विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करण्याचे वेळापत्रक करणे सोपे जाणार आहे. या सुट्ट्यांची यादी समोर आल्यानंतर पालकांना देखील त्यांच्या कामाचे व्यवस्थित नियोजन करताना येणार आहे.
सुट्ट्यांची यादी पाहता मार्च महिन्यात साधारण एक आठवडा सुट्टी असणार आहे. या सुट्ट्या महाराष्ट्र, यूपी, बिहार, हरियाणा आणि उत्तर भारतासह देशभरातील अनेक राज्यांसाठी आहेत. याशिवाय गुढीपाडव्याची सुट्टी फक्त महाराष्ट्र, गोवा, मध्य प्रदेश आणि दमण दीवमध्येच राहणार आहे. अनेक शाळांना शनिवारी अर्धा दिवस किंवा पूर्ण दिवस सुट्टी असते.

५ मार्च- रविवार
८ मार्च- बुधवार (होळी)
१२ मार्च – रविवार
१९ मार्च- रविवार
२२ मार्च – बुधवार (गुढी पाडवा)
२६ मार्च – रविवार
३० मार्च – गुरुवार (राम नवमी)
या सुट्यांव्यतिरिक्त ज्या राज्यांमध्ये बोर्डाच्या परीक्षा होत आहेत किंवा होणार आहेत तेथील सुट्टी किंवा अर्ध्या दिवसाच्या सुट्टीचा निर्णय संबधित शाळा घेत असते.
मार्च महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे ३१ मार्चला सुट्टी ऐच्छिक असते. ती देखील पूर्णपणे शाळेवर अवलंबून असते.