जिओचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान, फ्री मध्ये पाहा नेटफ्लिक्स आणि प्राइम व्हिडिओ, कॉलिंग आणि डेटाही

नवी दिल्लीः Reliance Jio 399 Rs Postpaid Plan: रिलायन्स जिओकडे आपल्या प्रीपेड ग्राहकांशिवाय, अनेक सारे पोस्ट पेड प्लान उपलब्ध आहेत. जिओ ग्राहकांना पोस्ट पेड प्लानमध्ये ओटीटी अॅक्सेस फ्री मध्ये ऑफर केले जात आहेत. जर तुम्हाला ओटीटीची आवड असेल तर तुम्ही पोस्टपेड प्लान खरेदी करू शकता. रिलायन्स जिओच्या सर्वात स्वस्त रिचार्ज प्लानची किंमत ३९९ रुपये पासून सुरू होते. या प्लानमध्ये यूजर्सला कोणती सुविधा मिळते, जाणून घ्या डिटेल्स.

Reliance Jio 399 Rupees Postpaid Plan
रिलायन्स जिओकडे ३९९ रुपयाचा पोस्ट पेड प्लान आहे. या प्लानमध्ये यूजर्सला ७५ जीबी हाय स्पीड डेटा मिळतो. या प्लानमध्ये २०० जीबी डेटा रोलओव्हर केला जातो. याचा अर्थ या प्लानमध्ये महिनाभरात डेटा संपला नाही तर उरलेला डेटा पुढच्या महिन्यात वापरता येवू शकतो. जिओ ग्राहकांना प्लानमध्ये मिळणारा इंटरनेट डेटा संपल्यानंतर १० रुपये प्रति जीबी या हिशोबाप्रमाणे वापरता येवू शकतो.

वाचाः Airtel ला या प्लानमधून Jio चे तगडे आव्हान, महिनाभर वैधता, कॉलिंग आणि डेटाची सुविधा

याशिवाय, जिओच्या ग्राहकांना अनलिमिटेड व्हाइस कॉलची सुविधा मिळते. याचा अर्थ देशात कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड लोकल व एसटीडी कॉल करता येवू शकते. या प्लानमध्ये १०० एसएमएस रोज दिले जाते. ३९९ रुपयाच्या प्लानमध्ये अन्य बेनिफिट्स सुद्धा मिळतात. ग्राहकांना Netflix (Mobile Plan), Amazon Prime, JioTV, JioSecurity, JioCloud सारखी सुविधा मिळते. तसेच अमेझॉन प्राइम व्हिडिओचे सब्सक्रिप्शन १ वर्षापर्यंत मिळते. तसेच तुम्हाला जिओच्या 5G Services चा वापर करता येवू शकतो.

वाचाः अर्ध्यापेक्षाही कमी किंमतीत मिळतोय Lenovo i3 Laptop, आतापर्यंतचा सर्वात मोठा डिस्काउंट

वाचाः विजेविना चालणारा पंखा आला, किंमत फक्त ३६९ रुपये, फीचर्स पाहून दंग व्हाल

Source link

Jio 399 Rs Postpaid PlanJio Postpaid PlanReliance Jio 399 PlanReliance Jio 399 Rupees Postpaid Planreliance jio planreliance jio postpaid plan
Comments (0)
Add Comment