या रंगाची काढा रांगोळी
देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घराबाहेर पिवळ्या आणि लाल रंगाने रांगोळी काढा. वास्तूमधील रंगांशी संबंधित उपायांचा अवलंब करुन अनेक प्रकारचे वास्तू दोष दूर केले जाऊ शकतात. अशा रंगांच्या रांगोळ्या काढल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्या भक्तांवर आशिर्वादाचा वर्षाव करते, अशी मान्यता आहे.
मोत्याचा शंख
वास्तुशास्त्रानुसार होळीच्या दिवशी मोत्याचा शंख आणावा. यानंतर पूजागृहात ठेवून त्याची नित्य पूजा करावी. असे केल्याने घरात सुख-समृद्धी येते असे मानले जाते. दुसरीकडे हा मोती शंख देवी लक्ष्मीसमोर ठेवल्यास जीवनातील आर्थिक संबंधित समस्याही दूर होऊ लागतात. याशिवाय व्यवसायात गडबड होत असेल तर होळीच्या दिवशी मोत्याचा शंख घेऊन त्याची पूजा करून व्यवसायाच्या ठिकाणी ठेवा. असा विश्वास आहे की लवकरच त्याची सकारात्मक उर्जा व्यवसायात देखील नफा मिळवून देईल.
या चित्रामुळे कार्यक्षेत्रात फायदा होईल
घराच्या नैऋत्य दिशेला सहकुटुंब फोटो किंवा सूर्यफुलाचे चित्र लावा. होळीच्या दिवशी तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात सूर्यदेवाचे चित्र लावू शकता. उगवत्या सूर्याचे चित्र लावल्याने तुम्हाला खूप फायदा होईल. हे चित्र लावताना तुम्हाला दिशेची विशेष काळजी घ्यावी लागेल. वास्तूनुसार ऑफिस किंवा दुकानात उगवत्या सूर्याचे चित्र पूर्व दिशेलाच लावावे. असे केल्याने कुटुंबातील कलह दूर होतो असे मानले जाते. याशिवाय प्रत्येकाचे एकमेकांबद्दलचे प्रेम आणि आपुलकीही वाढते. तसेच, शत्रूंची वाईट नजर दूर होते आणि देवाच्या कृपेने त्यांचा आपोआप पराभव होतो.
राधाकृष्ण आणि गणपतीचा फोटो
वास्तुदोषांमुळे पती-पत्नीमध्ये सामंजस्य असतानाही अनेकदा वाद होतात. हे वाद दूर करण्यासाठी होळीच्या दिवशी बेडरुममध्ये राधा-कृष्णाचे चित्र लावावे. आपण घरामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि राधाच्या मूर्ती देखील स्थापित करु शकता. वास्तुशास्त्रानुसार होळीच्या दिवशी घराच्या मुख्य दरवाजावर विघ्नहर्ता श्री गणेशाचा फोटो किंवा मूर्ती लावा.