सायकलचे पंक्चर काढण्याचे काम
गुजरात कॅडरचे आयएएस वरुण बरनवाल हे मूळचे महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील बोईसरचे आहेत. त्यांचे वडील सायकल पंक्चरचे दुकान चालवायचे. २००६ पर्यंत वरुण बरनवालच्या आयुष्यात सर्व काही ठीक होते. पण दहावीची परीक्षा दिल्यानंतर चार दिवसांनी त्याच्या वडिलांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वडिलांच्या निधनानंतर आईने वरुणला शिक्षण सोडू दिले नाही. वरुणने अभ्यासासोबतच वडिलांचे सायकल दुरुस्तीचे दुकानही चालवालया घेतले. वरुणची अकरावी आणि बारावी फी शाळेतील शिक्षकांनी मिळून भरली होती. वरुणच्या वडिलांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी स्वतःच्या खिशातून कॉलेजच्या प्रवेश शुल्कासाठी १० हजार रुपये खर्च केले. कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर वरुणने मागे वळून पाहिले नाही.
कॉलेजमध्ये टॉप केल्यानंतर त्याला स्कॉलरशिप मिळू लागली तेव्हा परिस्थिती थोडी सुधारली. इंजिनीअरिंगनंतर त्यांनी नोकरी सुरू केली. दरम्यान, वरुणकुमार बरनवालने यूपीएससीची तयारी सुरू केली. २०१३ मध्ये ते ३२ वी रँक मिळवून गुजरात कॅडरमध्ये आयएएस झाले.
अंडी विकावी लागली
मनोज कुमार रॉय यांनी २०१० मध्ये यूपीएससी परीक्षेत ऑल इंडिया रँक (AIR) ८७० मिळवले होते आणि भारतीय आयुध निर्माणी सेवेत ते नियुक्त झाले. ते मूळचे बिहारच्या सुपौलचे आहेत. १९९६ मध्ये मनोज कुमार सुपौलहून दिल्लीला आले. दिल्लीत त्यांनी उदरनिर्वाहासाठी अंडी आणि भाज्यांची एक गाडी चालवाली. त्यानंतर जवाहरलाल नेहरू विद्यापीठात रेशन पोहोचवण्याचे काम सुरू केले. २००५ मध्ये त्यांनी पहिल्यांदा यूपीएससी परीक्षा दिली पण त्यांना यश मिळाले नाही. २०१० साली चौथ्या प्रयत्नात त्यांनी यशाला गवसणी घातली. रॅंक मोठी असल्याने त्यांना इंडियन ऑर्डनन्स फॉक्टरीज सर्व्हिस कॅडर मिळाले. त्यांच्या पहिली पोस्टिंग बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील राजगीर ऑर्डनंस फॅक्टरी येथे एक प्रशासकीय अधिकाऱ्याच्या रुपात झाली.