Nothing Phone 2 ची पहिली झलक, कंपनीच्या CEO ने सांगितले कसा असेल फोन

नवी दिल्लीः Nothing Phone 2 Details: नथिंग ने गेल्या वर्षी म्हणजेच २०२२ मध्ये आपला पहिला स्मार्टफोन Nothing Phone 1 ला लाँच केले होते. या स्मार्टफोनच्या लाँचिंग आधी फोनची खूपच चर्चा झाली होती. ब्रँडने या फोनला आकर्षक फीचर्स सोबत अपर मिड रेंज बजेट मध्ये लाँच केले होते. याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आता कंपनी याचे नेक्स्ट व्हर्जन म्हणजेच Nothing Phone 2 ला घेवून येत आहे. बार्सिलोना मध्ये सुरू असलेल्या मोबाइल वर्ल्ड काँग्रेस २०२३ मध्ये विविध ब्रँड्स आपल्या प्रोडक्ट्स लाँच करीत आहेत. Nothing चे CEO Carl Pei ने ने फोन २ ला टीझ केले आहे. Nothing Phone 2 स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 8 चिपसेट सोबत येईल, असे त्यांनी सांगितले.

नवीन फोन असेल महाग
यासंबंधी अद्याप काहीही स्पष्ट करण्यात आले नाही. प्रोसेसर Snapdragon 8+ Gen 1 असेल किंवा Snapdragon 8 Gen 2. अपेक्षा आहे की, Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर यूज करू शकते. Carl Pei ने सांगितले की, Nothing Phone 2 आधीच्या फोनच्या तुलनेत जास्त प्रीमियम असेल. नवीन स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 8 चिपसेट येईल. हा एक प्रीमियम डिव्हाइस असेल. Nothing Phone 1 मध्ये कंपनी ने Snapdragon 778G Plus चिपसेटचा वापर केला होता. अपकमिंग स्मार्टफोन संबंधी कंपनीने चिपसेट शिवाय, कोणतेही टीज केले नाही.

वाचाः अर्ध्यापेक्षाही कमी किंमतीत मिळतोय Lenovo i3 Laptop, आतापर्यंतचा सर्वात मोठा डिस्काउंट

काय असू शकतात स्पेसिफिकेशन्स
या फोनवरून अनेक अंदाज लावले जात आहेत. लीक रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, Nothing Phone 2 मध्ये AMOLED डिस्प्ले दिला जावू शकतो. जो 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट सोबत येईल. यात १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेजचे ऑप्शन मिळू शकते. फोनमध्ये ५००० एमएएच क्षमतेची बॅटरी आणि ३३ वॉटची चार्जिंग सपोर्ट मिळू शकते.

वाचाः OnePlus चा हा Smart TV स्वस्तात खरेदी करण्याची संधी, पाहा जबरदस्त ऑफर

वाचाः Xiaomi 13 Pro लाँच होताच, Xiaomi 12 Pro स्मार्टफोनच्या किंमतीत १० हजार रुपयांची कपात

Source link

Nothing Phone 2nothing phone 2 featuresnothing phone 2 pricenothing phone 2 price in indianothing phone 2 release datenothing phone 2 specification
Comments (0)
Add Comment