Vivo V27e Features
विवोच्या या फोनची डिझाइन खूप मस्त आहे. मिड रेंज हिशोबाप्रमाणे खास आहे. हँडसेटच्या रियर पॅनेलवर एक यूनिक डिझाइन मिळते. रियर पॅनेलवर कलर चेंजिंग टेक्नोलॉजी सपोर्ट करीत नाही. परंतु, फोनला तीन कलर व्हेरियंट मध्ये आणले आहे. बॅक पॅनेलवर Aura Light दिली आहे जी LED लाइट ऑफर करते. Vivo V27e मध्ये 6.62 इंच AMOLED डिस्प्ले दिले आहे. जो फुल एचडी प्लस रिझॉल्यूशन सपोर्ट करते. स्क्रीनचा रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज दिले आहे. डिव्हाइस मध्ये मीडियाटेक हीलियो G99 प्रोसेसर दिले आहे. फोनमध्ये १२ जीबी पर्यंत रॅम आणि २५६ जीबी पर्यंत इनबिल्ट स्टोरेज दिले आहे.
वाचाः OnePlus चा हा Smart TV स्वस्तात खरेदी करण्याची संधी, पाहा जबरदस्त ऑफर
हँडसेट मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी, २ मेगापिक्सलचा मायक्रो आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिले आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी ३२ मेगापिक्सलचा सेल्फी सेन्सर दिले आहे. विवोच्या या फोनला पॉवर देण्यासाठी 4600mAh ची बॅटरी दिली आहे. जी 66W फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. हा स्मार्टफोन अँड्रॉयड 13 बेस्ड FuntouchOS 13, हाइब्रिड ड्यूल सिम ट्रे, IP54 डस्ट आणि स्प्लॅश रेजिस्टेंस व स्टीरियो स्पीकर्स सोबत येते. या फोनला लॅवेंडर, ग्लोरी ब्लॅक आणि लिवली ग्रीन ऑप्शन मध्ये खरेदी करू शकता. फोनच्या ८ जीबी रॅम व २५६ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत 1,299RM जवळपास २४ हजार रुपये आहे. हा फोन मलेशियात खरेदीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे.
वाचाः Nothing Phone 2 ची पहिली झलक, कंपनीच्या CEO ने सांगितले कसा असेल फोन