HSC Exam: बारावीच्या विद्यार्थ्यांची चिंता मिटली, उत्तरपत्रिका तपासणीवरील बहिष्कार मागे घेण्याचा निर्णय

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर

बारावी उत्तरपत्रिका तपासणीवरील बहिष्कार कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी मागे घेतला. शिक्षणमंत्री यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. महासंघाचे विविध विभागातील प्रतिनिधी बैठकीत सहभागी होते. तेरा प्रश्नांवर बैठकीत चर्चा करण्यात आली.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची बारावी परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरु झाली. यंदा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकला. पहिल्या दिवसापासून नियामकांच्या बैठकाही झालेल्या नाहीत. त्यामुळे प्रश्नपत्रिका, नमूना उत्तरपत्रिका, उत्तरपत्रिकांच्या गठ्ठ्यांचे ढिग शिक्षण मंडळ, परिरक्षक केंद्रात (कस्टडीत) लागले. उत्तरपत्रिका तपासणीवरून विधीमंडळात प्रश्न चर्चेला गेला.

त्यानंतर गुरुवारी शिक्षणमंत्री यांनी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. सरकारने प्रलंबित प्रश्न सोडविण्याबाबत सकारात्मकता दर्शविल्यानंतर संप मागे घेण्याचा निर्णय महासंघाने घेतल्याचे सांगण्यात येते. यापूर्वी दोन वेळा प्राथमिक स्तरावर बैठकी झाल्या होत्या. परंतु प्रश्न निकाली निघाला नव्हता.

गुरुवारी परत शिक्षणमंत्री यांच्यासोबत प्रदीर्घ चर्चा झाल्यानंतर संप मागे घेण्यात आला. त्यामुळे गुरुवारपासून नियामकांच्या बैठका व शुक्रवारपासून उत्तरपत्रिका तपासणीची प्रक्रिया सुरु होणार असल्याचे सांगण्यात येते.

या मागण्यांवर सरकारने दिले आश्वासन

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या विविध मागण्या आहेत. यामध्ये जुनी पेन्शन योजनेबाबत शासनाने ठरविलेल्या धोरणाच्या अनुषंगाने निर्णय घेण्यात येईल, आश्वासित योजनेबाबत सुधारित प्रस्ताव वित्त विभागाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात येणार आहे.वाढीव पदांना रुजू दिनांकापासून मंजुरी, आयटी विषय अनुदानित करणे याबाबत बैठक आयोजित करणे, अनुदानाबाबत वित्त विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात येईल.

शिक्षक भरतीची प्रक्रियेच्या प्रश्नाबाबत नियुक्तीची प्रक्रिया राबविण्यात येईल, कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थी पटसंख्येचे निकष शाळा संहितेनुसार असावेत या प्रश्नावर योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे विविध तेरा प्रश्नांबाबत सरकारने आश्वासन दिल्याचे सांगण्यात येते.

शिक्षणमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. महासंघ नियामक मंडळासमवेत सविस्तर चर्चा झाली. महासंघाने सादर केलेल्या मागण्यांपैकी महत्वाच्या मागण्या मान्य केल्यामुळे महासंघाने बहिष्कार आंदोलन मागे घेतल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघाचे सरचिटणीस प्रा. संतोष फाजगे यांनी दिली.

Source link

12th Exam12th examinationBoycott backHSC answer sheetHSC Answer SheetsHSC ExamHSC Exam BoardHSC Exam CentreHSC Exam timetableHSC studentsmaharashtra state boardmaharashtra state board of secondary educationsecondary and higher secondary educationssc and hsc board exam 2023ssc and hsc exam 2023ssc hsc board exam newsssc hsc board maharashtraउत्तरपत्रिका तपासणीविनाबारावी उत्तरपत्रिकाबारावी परीक्षाबारावीचे विद्यार्थी
Comments (0)
Add Comment