आमलकी एकादशी २०२३: व्रत पूजाविधी, शुभ योग मुहूर्त, मान्यता आणि कथा जाणून घ्या

फाल्गुन शुक्लात येणाऱ्या एकादशीला आमलकी एकादशी असे म्हटले जाते. शुक्रवार ३ मार्च रोजी आमलकी एकादशी असून, पुराणांमध्ये या आमलकी एकादशीला अनन्य साधारण महत्त्व आहे. फाल्गुन पौर्णिमा म्हणजेच होळीपूर्वी ही एकादशी येत असल्यामुळे याला रंगभरनी एकादशी असेही म्हणतात. या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा केली जाते. पौराणिक मान्यतेनुसार, आमलकी एकादशीचे व्रत करू शकत नाही, त्यांनी आवळ्याचे सेवन केले पाहिजे. तसेच या एकादशीला भगवान विष्णूचे पूजन केल्याने लाभ होतो, अशी मान्यता आहे.

​एकादशी मुहूर्त

हिंदू पंचांगानुसार आमलकी, रंगभरनी एकादशी प्रारंभ गुरुवार २ मार्च रोजी सकाळी ६ वाजून ३९ मिनिटांनी होईल. तसेच शुक्रवार ३ मार्च रोजी सकाळी ९ वाजून १ मिनिटांनी समाप्ती होईल. उदयातिथीनुसार एकादशी ३ मार्च रोजी साजरी होईल.

​शंकर-पार्वतीचा संबंध

भगवान शंकर आणि पार्वती यांचा विवाह झाल्यानंतर ते प्रथम काशी येथे आले. म्हणून या दिवशी रंगभरनी एकादशी साजरी केली जाते. तेव्हापासून फाल्गुन शुद्ध एकादशी रंगभरनी एकादशी म्हणून साजरी केली जाते. या दिवशी संपूर्ण काशी गुलालमय होऊन जाते. विश्वनाथ मंदिरात विशेष पूजा, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

​​आवळ्याच्या झाडाचे पूजन

पौराणिक कथेनुसार, भगवान विष्णूंनी आवळ्याच्या झाडाची निर्मिती केल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या दिवशी आवळ्याच्या झाडाचे पूजन करण्यास सांगितले जाते. आवळ्याच्या झाडाजवळचा परिसर स्वच्छ करून घ्यावा. या झाडाखाली कलशाची स्थापना करावी. भगवान विष्णूचे नामस्मरण करून पूजन करावे. कलशाला धूप, दीप आणि नैवेद्य दाखवावा. तसेच आवळ्याचे सेवन करावे.

​आमलकी एकादशीचे महत्व आणि लाभ

शरद ऋतू संपून वसंत ऋतूचा आरंभ होळीपासून होतो. ऋतूचक्र आणि निसर्गचक्र या काळात बदलते. शांत वातावरणात दाहकतेकडे जाणार असते. या वातावरणीय बदलाची आपल्या शरीराला सवय व्हावी, यासाठी आपल्याकडील व्रत, परंपरा, पूजन महत्त्वाचे आहेत. आवळा हा विष्णू देवाला अत्यंत प्रिय असल्याचे मानले जाते. आवळा झाडाच्या पूजनामुळे गोदानाचे पुण्य मिळते, अशी मान्यता आहे. तसेच आवळ्याचे औषधी गुणधर्म आणि उपयोगिता याला अनन्य साधारण महत्व आहे. मधुमेह, हृदयाचे आजार, पचनक्रिया, वजन कमी करणे, हाडे मजबूत करणे, डोळ्यांसाठी गुणकारी, संसर्गापासून संरक्षण करणे, असे काही उपयोग आवळ्याचे सांगितले जातात.

Source link

amalki ekadashiAmalki Ekadashi 2023amalki ekadashi shubh muhuratvrat katha puja vidhi of amalki ekadashiआमलकी एकादशी व्रत पूजाविधीआमलकी एकादशी २०२३एकादशी मान्यता आणि कथाएकादशी शुभ योग मुहूर्तरंगभरनी एकादशी
Comments (0)
Add Comment