अश्विनी जगताप मूळच्या साताऱ्याच्या आहेत. त्यांचे वडील हे निवृत्त पोलीस अधिकारी आहेत. त्या प्रतिभा महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा असून यामाध्यमातून त्या बचत गट चालविले जातात. अश्विनी जगताप यांनी महिलांच्या प्रश्नासाठी काम केले आहे. अनेक सामाजिक आणि धार्मिक कार्यांमध्ये त्यांचा पुढाकार असतो. लक्ष्मण जगताप निवडणुकीत उभे असताना देखील त्या सक्रीय असायच्या. त्यामुळे मतदार संघात त्यांची चांगली ओळख होती.
आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर चिंचवडमध्ये पोटनिवडणूक लागली. दरम्यान भाजपकडून लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी यांना उमेदवारी देण्यात आली होती. प्रचारादरम्यान लक्ष्मण जगताप यांची उणीव भासते असं अश्विनी जगताप सांगतात. अश्विनी लक्ष्मण जगताप या पुण्याच्या आहेत. हुजूरपागा येथील महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटीमधून त्यांनी शिक्षण घेतले आहे. अश्विनी जगताप यांनी दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे.
अश्विनी जगताप यांची निवडणूक लढविण्याची ही पहिलीच वेळ आहे. चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे ३ जानेवारी २०२३ रोजी दीर्घ आजाराने निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर येथील आमदारकीची जागा रिक्त झाली होती. त्यामुळे लोकभावनेचा आदर करत भाजपने त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी जाहीर केली. लक्ष्मण जगताप यांच्या निधनाच्या अवघ्या १५ दिवसांत येथे पोटनिवडणूक जाहीर झाली.