हायलाइट्स:
- म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाकडून तब्बल ८ हजार २०५ घरांच्या सोडतीची घोषणा.
- यांपैकी ९७ टक्के घरे ही अल्प आणि अत्यल्प उत्पन्न असलेल्या गटांसाठी आहेत.
- सर्वसामान्यांचे स्वप्न साकार करणाऱ्या या सोडतीची घोषणा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज केली.
मुंबई: म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाकडून तब्बल ८ हजार २०५ घरांच्या सोडतीची आज घोषणा करण्यात आली आहे. सर्वसामान्यांचे स्वप्न साकार करणाऱ्या या सोडतीची घोषणा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज केली. यांपैकी ९७ टक्के घरे ही अल्प आणि अत्यल्प उत्पन्न असलेल्या गटांसाठी आहेत. (housing minister jitendra awhad announces mhada konkan mandal house lottery for 8205 houses)
राज्यात करोनाचा उद्रेक झाल्यानंतर कोकण मंडळाची सोडत प्रलंबित होती. यापूर्वीची म्हाडाच्या कोकण मंडळाची सोडत सन २०१८ मध्ये निघाली होती. त्यावेळी ती ९ हजार ०१८ घरांसाठीची सोडत होती. यंदाच्या सोडतीद्वारे सर्वसामान्यांना ८ हजार २०५ घरे उपलब्ध होत आहेत.
क्लिक करा आणि वाचा- भाजप-मनसे युती होणार?; उद्या चंद्रकांत पाटील घेणार राज ठाकरेंची भेट
कोकणातील या लॉटरीच्या माध्यमातून अत्यल्प उत्पन्न गटासाठी ७० टक्के घरे, अल्प उत्पन्न गटासाठी २७ टक्के घरे उपलब्ध होणार असल्याची माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. म्हणजेच एकूण ९७ टक्के घरे ही अल्प आणि अत्यल्प गटांसाठी उपलबेध होणार आहेत.
क्लिक करा आणि वाचा- ‘कोण अमृता फडणवीस?’; महापौर किशोरी पेडणेकर यांचे प्रत्युत्तर
दसऱ्यादरम्यान काढणार सोडत
कोकण मंडळाच्या या घरांची सोडत दसऱ्यादरम्यान काढण्यात येणार आहे. या सोडतीची जाहिरात लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल अशी माहिती कोकण मंडळाचे मुख्य अधिकारी नितीन महाजन यांनी दिली आहे. या सोडतीत पंतप्रधान आवास योजनेतील ६५०० घरांचा समावेश असून कोकण मंडळाच्या गृहप्रकल्पातील २००० घरांचा समावेश आहे. तसेच २० टक्क्यांच्या योजनेत ५०० घरे उपलब्ध होत आहेत.
क्लिक करा आणि वाचा- पेन्शन न मिळाल्याने नैराश्य; निवृत्त कर्मचाऱ्याने पालिकेतच अंगावर पेट्रोल ओतून घेतले
या सोडतीत ३०० ते ७०० चौरस फुटांपर्यंतची घरे उपलब्ध होणार आहेत. तर या घरांची किंमत १२ लाख ते ५६ लाखांपर्यंत असणार आहे.