SSC Exam:दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना हॉल तिकिटाची केवळ झेरॉक्स

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तिडके कॉलनी परिसरातील सेंट फ्रान्सिस शाळेने दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना हॉल तिकिटाची केवळ झेरॉक्स दिल्याचा प्रकार पुढे आला आहे. याबाबत पालकांनी शिक्षण विभागाकडे तक्रार दाखल केली आहे. माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील यांनी संबंधित शाळेशी संपर्क साधून, विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्याचा आदेश संबंधित शाळेला दिला आहे.

सेंट फ्रान्सिस शाळा आणि पालकांमध्ये फी वरून अनेक वर्षांपासून वाद आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा आज, शुक्रवारी दहावीचा पहिला पेपर आहे. या परीक्षेसाठी शाळेतील विद्यार्थ्यांना हॉल तिकीट अनिवार्य आहे. परंतु, शाळेने हॉल तिकिटाची मूळ प्रत न देता काही विद्यार्थ्यांना गुरुवारी झेरॉक्स प्रत दिल्याने हे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

यामुळे पालकांनी नाशिक पॅरेंट्स असोसिएशनच्या माध्यमातून माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील तसेच शिक्षण उपसंचालक भाऊसाहेब चव्हाण यांच्याकडे शाळेविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. मुख्याध्यापिका रणजीत कौर या विद्यार्थ्यांवर अन्याय करीत असून, त्यांना या परीक्षा प्रक्रियेपासून लांब ठेवण्याची मागणी केली आहे. या तक्रारीनंतर शिक्षणाधिकारी पाटील यांनी शाळेशी संपर्क साधून विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित न ठेवण्याचा आदेश दिला. संबंधित विद्यार्थ्यांना तातडीने हॉल तिकिट देण्यास त्यांनी सांगितले. मात्र, शाळेने हॉल तिकिटाची झेरॉक्स दिली.

संबंधित विद्यार्थ्यांची कोणतीही अडवणूक शाळेने केलेली नाही. या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षाही झालेल्या आहेत. तसेच त्यांचा परीक्षेचा आसन क्रमांकही याच शाळेतील केंद्रावर आहे. शाळेने प्रत्येक हॉल तिकिटाची झेरॉक्स काढली आहे. त्यामुळे काही विद्यार्थ्यांनाही झेरॉक्स दिली गेली असेल. परंतु, याचा अर्थ त्यांना परीक्षेपासून वंचित ठेवले जाईल, असा नाही. शाळा कोणत्याही विद्यार्थ्याचे नुकसान करणार नाही.
– रणजीत कौर, मुख्याध्यापिका, सेंट फ्रान्सिस हायस्कूल

पुणे विभागात पाच कॉपीची प्रकरणे

कॉपीमुक्त परीक्षा अभियान राबवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाला दहावीच्या पहिल्या दिवशी कॉपीचे प्रकार रोखण्यात काही प्रमाणात यश आले आहे. पुणे विभागात दिवसभरात पाच कॉपीची प्रकरणे आढळली. राज्यातील एकूण नऊ विभागांचा विचार केल्यास एकूण नऊ प्रकरणे समोर आली आहेत.

RTE प्रवेश प्रक्रिया कशी असते? कोणती कागदपत्रे लागतात? सर्वकाही जाणून घ्या

Source link

10th exam12th ExamBoard ExamGPS Tracking SystemHSC ExamHSC Question papermaharashtra state boardmaharashtra state board of secondary educationMaharashtra Timessecondary and higher secondary educationssc and hsc board exam 2023ssc and hsc exam 2023SSC ExamSSC Exam Studentsssc hsc board exam newsssc hsc board maharashtraSSC HSC ExamSSC HSC Exam 2023SSC Question paperstudentsXerox of Hall Ticketदहावी परीक्षादहावी-बारावी परीक्षादहावीची परीक्षाबारावी प्रश्नपत्रिका जीपीएस ट्रॅकिंग सिस्टिमबोर्ड परीक्षांचे काउंटडाउन सुरुहॉल तिकिटाची केवळ झेरॉक्स
Comments (0)
Add Comment