Authored by Priyanka Wani | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 3 Mar 2023, 4:07 pm
Mangal Rashi Parivartan : मंगळ ग्रह वृषभ राशीतून मिथुन राशीत प्रवेश करत असून, ५ महिन्यांनी हे मार्गक्रमण होत आहे. मिथुन राशीत मंगळाचे येणे आणि शनीचा नवम पंचम योग बनणे, तसेच सूर्य आणि गुरूचे राशी बदलणे ही एक मोठी ज्योतिषीय घटना असेल, ज्यामुळे मिथुन राशीचे लोक मंगळाच्या संक्रमणादरम्यान ऊर्जा आणि उत्साहाने परिपूर्ण असतील. मिथुन राशीच्या लोकांचा उत्साह द्विगुणीत असेल. जाणून घेऊया मिथुन राशीत मंगळ आल्याने कोणत्या राशींना फायदा होईल, कोणत्या राशीसाठी मिथुन राशीतील मंगळ शुभ राहील.