मराठी विषयातील प्रश्नपत्रिकेत व्याकरणाच्या प्रश्नात शब्दांऐवजी वाक्य देत शब्द दुरुस्त करून वाक्य पूर्ण करायचे होते. तर उर्दू विषयातील प्रश्नपत्रिकेत काही छपाईच्या चुका होत्या असे शिक्षकांनी सांगितले. यामध्ये प्रश्न क्रमांक तीनमधील एका शब्दाची छपाई चुकली, नज्ममध्ये नुक्ते अधिक आले तर प्रश्न क्रमांक पाचमध्ये आपबीतीवर प्रश्न विचारण्यात आला नाही, असे शिक्षकांनी सांगितले.
उर्दू विषयाचा पेपरही सोपा होता. कोविडमध्ये दोन वर्षे शाळा बंद होत्या. ऑनलाइन तासिका झाल्या परंतु मर्यादा होत्या. त्यानंतर यंदा तासिका सुरळीत सुरु झाल्या. सराव कमी झाल्याने निर्धारीत वेळेत विद्यार्थ्यांना पेपर सोडवणे शक्य होईल का, याबाबतही शिक्षक, पालकांना चिंता होती. परंतु पहिला पेपर बहुतांशी विद्यार्थ्यांना निर्धारीत वेळेत पेपर सोडविता आल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितल्याचे शिक्षकांनी सांगितले.
प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांचे स्वरुप सहज, सोपे होते. पेपर सोपा असल्याने बहुतांशी विद्यार्थ्यांनी पेपर निर्धारीत वेळेत सोडविल्याचे सांगितले. कोविडनंतर दोन वर्षांनी परीक्षा नियमित पद्धतीने होत असल्याने काहीशी चिंता होती परंतु प्रश्नपत्रिकेचे स्वरुप पाहून विद्यार्थी आनंदी होते. व्याकरणाच्या प्रश्ना शब्दऐवजी वाक्य देत प्रश्न विचारण्यात आला होता.
शर्मिला जैन, मराठी विषय शिक्षक
प्रश्नपत्रिकेत अवघड असे प्रश्न नव्हते. काठिण्य पातळी मध्यम स्वरुपाची होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना पेपर सोपा गेला. परीक्षेच्या अनुषंगाने शाळांमध्येही सराव झाल्याचा विद्यार्थ्यांना फायदा झाला. तीन प्रश्नांमध्ये छपाईच्या चुका असल्याचेही दिसून आले, परंतु एकंदरीत पेपर सोपा होता.
डॉ. नसरीन सुलताना सय्यद जलालुद्दीन, उर्दू विषय शिक्षक