होलिका दहनाची पूजा
ज्योतिषशास्त्रानुसार, होलिका दहनाच्या दिवशी नवविवाहित जोडप्यांनी घरातील सर्व ज्येष्ठांचे आशीर्वाद घेऊन लक्ष्मी नारायणाची पूजा करावी. लग्नानंतर ज्यांची पहिली होळी असेल, अशा नवविवाहित पती-पत्नीने मिळून होलिका दहनाची पूजा आवर्जून करावी. काही भागात लग्नानंतरची पहिलीच होळी असेल तर त्या जोडप्याने होळीच्या अग्निचे दर्शन घेऊ नये असे सांगितले जाते.
वैवाहिक जीवनात सुखशांतीसाठी
होलिका दहनाच्या दिवशी सर्व देवी-देवतांना, आपल्या कुलदेवाला गुलाल अर्पण करावे आणि पती-पत्नी एकमेकांना गुलाल लावतात आणि त्यांचे वैवाहिक जीवन शांततेत जावे यासाठी देवाकडे प्रार्थना करतात. संध्याकाळी पती-पत्नीने मिळून देवी लक्ष्मीची लाल दिवा आणि कापूर लावून आरती करावी आणि देवी लक्ष्मीला नैवेद्य म्हणून खीर करावी. असे मानले जाते की यामुळे घरात सुख-समृद्धी तर वाढतेच पण वैवाहिक जीवनात प्रेम आणि सौहार्दही वाढते.
होलिका दहनात या गोष्टी ठेवा
संध्याकाळी होलिका दहनाच्या वेळी जव किंवा अक्षत अग्नीत टाका. पत्नीने होलिकेच्या अग्नित खोबरे वाहावे. पुरणाची पोळी,वरणभात नैवेद्य दाखवावा. लोकं होलिकाभोवती प्रदक्षिणा घालतात. या आगीत नवीन पीक अर्पण केले जाते आणि भाजले जाते. भाजलेले धान्य प्रसाद म्हणून वाटले जाते. असे करणे शास्त्रात खूप शुभ मानले गेले आहे.
काळे कपडे घालू नये
पहिली होळी असेल तर लक्षात ठेवा की या काळात तुम्ही काळे कपडे घालू नका. असे मानले जाते की, काळ्या रंगाच्या कपड्यांकडे नकारात्मक ऊर्जा लवकर सक्रिय होते. यामुळे सुख-समृद्धी घराबाहेर जातेच पण वैवाहिक जीवनातील प्रेम आणि सौहार्दही कमी होते.
मोकळे केसं
होलिका दहनाच्या दिवशी स्त्रीने मोकळ्या केसांनी बाहेर जाऊ नये. असे म्हटले जाते की या दिवशी ग्रहांची स्थिती उग्र राहते आणि नकारात्मक ऊर्जा अधिक सक्रिय असते, त्यामुळे नवविवाहित मुलींनी मोकळ्या केसांनी बाहेर जाऊ नये.