नाशिकच्या महाविद्यालयांमधील शिक्षण ‘ए’ ग्रेड

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाविद्यालयांच्या गुणवत्तेचा दर्जा निश्चित करण्याच्या प्रक्रियेत केल्या जाणाऱ्या नॅक मूल्यांकनामध्ये शहरातील कला, वाणिज्य व विज्ञान शाखांत पारंपरिक शिक्षण देणाऱ्या बहुतांश महाविद्यालयांनी ‘ए’ ग्रेड मिळाली आहे. मूल्यांकन मुदत संपलेल्या महाविद्यालये नवीन मूल्यांकन प्रक्रियेच्या तयारीत आहेत. या तपासणीनंतर त्यांना पुन्हा नवीन ग्रेड मिळणार आहे.

‘नॅशनल असेसमेंट अँड अॅक्रिडेशन कौन्सिल’ या राष्ट्रीय पातळीवरील संस्थेमार्फत देशभरातील महाविद्यालयांच्या मूल्यांकनाची प्रक्रिया निश्चित केली असून, महाविद्यालयांच्या तपासणीनंतर सर्वसाधारणपणे पाच वर्षांच्या मुदतीसाठी महाविद्यालयांना ग्रेड दिली जाते.

कसे होते मूल्यांकन?
शिक्षणाचा दर्जा आणि महाविद्यालयांमार्फत विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधा यावर मुख्यत: महाविद्यालयांची तपासणी केली जाते. ‘नॅक’मार्फत शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांची समिती महाविद्यालयाला भेट देऊन ही तपासणी करते. या अहवालावरून महाविद्यालयांना ग्रेड दिली जाते. पात्रताधारक प्राध्यापक, ग्रंथालय, प्रयोगशाळा, क्रिडांगणासह अन्य भौतिक सुविधा, संशोधनातील योगदान, महाविद्यालय राबवित असणारे उपक्रम, विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या रोजगारसंधी यासरख्या मुद्यांवर हे मूल्यांकन केले जाते. ए++, ए+, ए, बी++, बी+, बी, सी, डी अशा ग्रेड महाविद्यालयांना दिल्या जातात.

महाविद्यालयांचा दर्जा उघड

‘नॅक’मार्फत मिळणारी ग्रेड ही त्या महाविद्यालयाची स्थिती दर्शविणारी असते. महाविद्यालयात प्रवेश घेताना ही श्रेणी पाहून अनेक विद्यार्थी प्रवेशाला प्राधान्य देतात. तसेच या मूल्यांकनामुळे महाविद्यालयांना आपला दर्जा समजण्यासही मदत होते. त्यामुळे नॅक मूल्यांकन करण्याला सध्या प्राधान्य दिले जात आहे.

‘नॅक’ ग्रेडचा लेखाजोखा

– केटीएचएम महाविद्यालय = ए ++

– एसव्हीकेटी, देवळाली कॅम्प = ए

– केएसकेडब्लू महाविद्यालय = ए

– एचपीटी-आरवायके महाविद्यालय = ए

– बीवायके वाणिज्य महाविद्यालय = ए

– हिरे महाविद्यालय, पंचवटी = ए

– भोंसला सैनिकी महाविद्यालय = ए

– व्ही. एन. नाईक महाविद्यालय, नाशिक = बी ++

– व्ही. एन. नाईक महाविद्यालय, दिंडोरी = बी ++

– कला, वाणिज्य महाविद्यालय, मखमलाबाद = बी +

– के. के. वाघ कला, विज्ञान महाविद्यालय = बी

– सीएमसीएस महाविद्यालय = बी

– ‘गोएसो’ महाविद्यालय, नाशिकरोड = बी

Source link

A GradeA Grade CollegesCareer NewsEducationeducation newsMaharashtra TimesNACNashik Educationनाशिक महाविद्यालयशिक्षण 'ए' ग्रेड
Comments (0)
Add Comment