‘होळी रे होळी पुरणाची पोळी’ होळीच्या ‘अशा’ द्या शुभेच्छा, वाचा आणि पाठवा

सोमवार ६ मार्च २०२३ रोजी होळी सण साजरा केला जात आहे. महाराष्ट्रात होळीच्या दिवशी समिधा म्हणून काही लाकडे मंत्रोच्चारात जाळण्यात येतात. या दहनावेळी नैवेद्य म्हणून पुरणपोळी आणि खोबरं यात दहन केलं जातं. तसेच होळी भोवती प्रदक्षीणा घातली जाते. काही ठिकाणी “होळी रे होळी पुरणाची पोळी” असं देखील म्हटलं जातं. नैवेद्य म्हणून टाकलेलं खोबरं प्रसाद म्हणून खाल्ला जातो. होळीच्या दुसऱ्या दिवशी वसंतोत्सवाचा प्रारंभ होतो. अशा या सणाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा.

होळीच्या शुभेच्छा

“होळीच्या पवित्र अग्निमध्ये,
निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो,
अणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख,
आरोग्य अणि शांति नांदो.
होळीच्या हार्दिक शुभेच्छा”

“मत्सर, द्वेष, मतभेद विसरू
प्रेम, शांती, आनंद चहुकडे पसरू…
अग्नित होळीच्या नकारात्मकता जाळू रे,
आली होळी आली रे!
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!”

होळीच्या हार्दिक शुभेच्छा

“जळो सर्व दोष जळो सर्व ईर्ष्या
चंद्रासारखे असावे मन सुंदर असावे जग
होळीच्या हार्दिक शुभेच्छा !”

“टाकून द्या होळीत आयुष्याच्या
अडचणी, चिंता, मनाचा गुंता..
करू होम दु:ख, अनारोग्याचा
होळीच्या हार्दिक शुभेच्छा”

होळी रे होळी पुरणाची पोळी, होळीच्या सर्वांना शुभेच्छा

“दहन व्हावे वादाचे पूजावे श्रीफळ संवादाचे

नात्यात यावा गोडवा पुरणपोळीचा
आनंद घेऊन येई सण हा होळीचा
होळीच्या हार्दिक शुभेच्छा “

“आली रे आली, होळी आली
चला, आज पेटवूया होळी
नैराश्याची बांधून मोळी
दाखवून नैवद्य पुरणपोळीचा
मारूया हाळी…
होळी रे होळी, पुरणाची पोळी
करू आनंदाने साजरी होळी
होळीच्या हार्दिक शुभेच्छा”

होळीच्या खूप खूप शुभेच्छा

“होळी करा नकारात्मक विचारांची,
होळी करा व्यसनांची,
होळी करा वैर भावनेची,
वाईटाची होळी करा, चांगल्याची संगत धरा.
होळीच्या हार्दिक शुभेच्छा !”

“ईडापीडा दुःख जाळी रे
आज वर्षाची होळी आली रे
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला
होळीच्या हार्दिक शुभेच्छा..!”

Source link

Holi 2023holi wishes 2023holi wishes messages in marathiholi wishes quotes whatsapp statusholika dahanहोळीहोळी रे होळी पुरणाची पोळीहोळी २०२३होळीच्या शुभेच्छाहोळीच्या हार्दिक शुभेच्छा
Comments (0)
Add Comment