कार्यक्षेत्रात काम करताना समस्या येत असतील तर
नोकरी असेल किंवा तुमचा व्यवसाय असेल त्यात सतत समस्या येत असतील तर तुम्ही होळीच्या राखेचा उपाय करू शकता. असे मानले जाते की, याचा उपयोग केल्याने तुम्हाला कार्यक्षेत्रात येणार्या समस्यांपासून मुक्ती तर मिळेलच पण त्याचबरोबर अनपेक्षित लाभ मिळायला सुरुवात होईल. यासाठी होळी दहनाच्या वेळी होळीची उलट्या दिशेने प्रदक्षिणा घालत असताना थोडी राख लावा. तसेच कार्यक्षेत्रातील सर्व समस्या दूर होऊ देत व तुम्हाला फायदा होऊ दे अशी प्रार्थना करा. परंतु हे उपाय दुसर्यांच्या बाबतीत वाईट विचार करण्यापेक्षा स्वतःचे चांगले व्हावे म्हणून करावेत याची जाणीवपूर्वक काळजी घ्या.
तांत्रिक कृतीपासून मुक्ती देणारा हा उपाय
एखाद्याने तुमच्यावर काही तांत्रिक क्रिया केली असे वाटत असेल तर होळी दहनाच्या वेळी होळीतील जळत्या अग्नीमध्ये दोन लवंगा, एक बताशा, एक पान आणि थोडीशी खडीसाखर घाला. त्याच्या दुसर्या दिवशी होळीची राख चांदीच्या तावीज मध्ये भरा व ते तावीज गळ्यात घाला. असे मानले जाते की, यामुळे तुमच्यावर जी काही तांत्रिक क्रिया केली असेल ती नष्ट होईल. तसेच लोकं कोणत्याही प्रकारच्या वाईट शक्ती किंवा तांत्रिक क्रियांना घाबरणार नाहीत.
पैशाशी संबंधित अडचणी असतील तर
जर तुम्हाला व्यवसायात नेहमी पैशांसंबंधित नुकसानीचा सामोरा करावा लागत असेल किंवा गुंतवणूकीशी संबंधित व्यवसायात तोटा होत असेल किंवा एखाद्याने पैसे घेतले तरी ते परत येत नसल्यास होळीची राख वापरून पहा. याकरीता डाळिंबाच्या झाडाच्या फांदिने त्या व्यक्तीचे नाव लिहा आणि त्यावर हिरवा रंग किंवा गुलाल टाका. जेव्हा होळी जळून जाईल त्यानंतर त्या ठिकाणची थोडी राख वाहत्या पाण्यात विसर्जित करा. मानले जाते की, असे केल्याने पैशाशी संबंधित सर्व समस्या दूर होतात.
टीप : ही सर्व माहिती भाविकांची श्रद्धा लक्षात घेऊन दिली जात आहे, तुमच्या श्रद्धा आणि विश्वासावर ज्योतिष उपाय आणि सल्ला वापरून पाहा. याचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणे आहे. या संदर्भात आम्ही कोणताही दावा करत नाही.