सचिन धर्माधिकारी यांना डॉक्टरेट पदवी देणाऱ्या टिब्रेवाला विद्यापीठाबद्दल जाणून घ्या

Tibrewala University: निरुपणकार सचिन धर्माधिकारी यांना श्री जगदीशप्रसाद झाबरमल टीबरेवाला विद्यापीठच्या वतीने मानद डॉक्टरेट पदवीनं (डी लिट) सन्मानित करण्यात आले. धर्माधिकारी परिवाराला सामाजिक कार्याचा मोठा वारसा लाभला आहे. हीच परंपरा पुढे नेणाऱ्या सचिन धर्माधिकारी यांच्या समाज कार्याबद्दल टिबरेवाला विद्यापीठाकडून हा गौरव करण्यात आला आहे. विद्यापीठातर्फे याआधी देखील कला, संगीत, अध्यात्मिक क्षेत्रातील दिग्गजांचा गौरव करण्यात आला आहे. दरम्यान सचिन धर्माधिकारी यांना सन्मानित करणाऱ्या श्री जगदीशप्रसाद झाबरमल टिब्रेवाला विद्यापीठाविषयी जाणून घेऊया.

शिक्षणापासून वंचित असलेल्या सर्वांसाठी उच्च शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने २००९ साली श्री जगदीशप्रसाद झाबरमल टिब्रेवाला विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. या विद्यापीठाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उदयोन्मुख औद्योगिक, व्यावसायिक संधी आणि व्यावहारिक ज्ञानावर भर देऊन वस्तु-केंद्रित मॉड्यूलर शिक्षण देण्यात येते. हे विद्यापीठ विज्ञान आणि व्यवस्थापनाच्या विविध क्षेत्रात जागतिक स्तरावर संशोधन करते.

सचिन धर्माधिकारी यांना डॉक्टरेट पदवी देत विद्यापीठाने ९ वा दीक्षांत समारंभ साजरा केला. टिबरेवाला विद्यापीठाने आतापर्यंत १८ राज्यपाल, अभिनेत्री हेमा मालिनी, बासरी वादक हरीप्रसाद चौरसीया, इस्कॉनचे सुरदास प्रभु अशा नामवंत प्रसिद्ध व्यक्तींचा सन्मान केला आहे.

राजस्थानच्या शेखावती या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी हे विद्यापीठ वरदान ठरले आहे. राज्यभरातील खाजगी विद्यापीठांमध्ये अव्वल दर्जाचे विद्यापीठ म्हणून ओळखले जाते. शिक्षण आणि संशोधनातील उत्कृष्ट केंद्र बनणे, ज्ञानाचे संवर्धन, निर्मिती, प्रगती आणि प्रसार घडवून आणणे, भारताला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी संशोधन आणि नवकल्पना वापरून अत्याधुनिक तंत्रज्ञानाची निर्मिती करणे आणि दर्जेदार शिक्षण आणि संशोधन देऊन विज्ञान, तंत्रज्ञान, व्यवस्थापन, फार्मास्युटिकल आणि सामाजिक विज्ञान क्षेत्रात लिडर्स तयार करणे हे विद्यापीठाचे ध्येय असल्याची माहिती वेबसाइटवर देण्यात आली आहे.

टिब्रेवाला विद्यापीठाचे कॅम्पस जयपूर शहरापासून १९८ किमी आणि नवी दिल्लीपासून २६३ किमी अंतरावर आहे. येथे वास्तुकला/ अभियांत्रिकी/ नर्सिंग/ फार्मसी/ विज्ञान संस्थांसाठी सुसज्ज स्पेसेस प्रयोगशाळा आहेत. यसोबतच विद्यापीठामध्ये हाय स्पीड हाय-स्पीड इंटरनेट कनेक्टिव्हिटीसह आधुनिक तांत्रिक सुसज्जतेसह आधुनिक प्रयोगशाळा देखील आहे.

मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक

यावेळी झालेल्या सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. सचिनदादांना डी लिट या पदवीनं सन्मानित करणं म्हणजे सद्गुरु परिवाराच्या प्रत्येक सदस्याचा सन्मान आहे. जगात अनेक विद्यापीठं असली तरी माणूस घडविणारं खरं विद्यापीठ हे रेवदांड्याला असल्याचे गौरवोद्गगार मुख्यमंत्र्यांनी यावेळी काढले.

अधिकृत वेबसाइटवर पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Source link

achin dharmadhikari d litt degreeappasaheb dharmadhikarCM Eknath Shinded litt degree awarded to sachin dharmadhikariEknath ShindeNaNa Dharmadhikarinanasaheb dharmadhikariNavi Mumbai newsSachin DharmadhikariTibrewala Universityजगदीशप्रसाद झाबरमल टिबरेवालाटीब्रेवाला युनिव्हर्सिटीटीब्रेवाला विद्यापीठसचिन धर्माधिकारी डॉक्टरेट
Comments (0)
Add Comment