Mumbai Local Trains: तेव्हाच सर्वांसाठी लोकल ट्रेन सुरू होईल; आदित्य ठाकरेंची माहिती

हायलाइट्स:

  • राज्यात टप्पानिहाय अनलॉकची प्रक्रिया सुरू
  • मुंबईतील लोकल ट्रेनकडे सर्वसामान्यांचे लक्ष
  • आदित्य ठाकरे यांनी दिली महत्त्वाची माहिती

मुंबई: राज्यात पाच टप्प्पात अनलॉक करण्याची घोषणा राज्य सरकारनं नुकतीच केली आहे. त्यासाठी जिल्हानिहाय पाच गट तयार करण्यात आले असून अनलॉकची अंमलबजावणी सुरू झाली आहे. मुंबई, उपनगर जिल्हा तिसऱ्या टप्प्यात आहे. त्यामुळं तिथं लोकल ट्रेन कधी सुरू होणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री व मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी या संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. (Aaditya Thackeray on Mumbai Local Trains)

वाचा: सत्ता हा नात्यांचा धागा नसतो; मोदी-ठाकरे भेटीवर शिवसेनेचं सूचक वक्तव्य

कोविडच्या परिस्थितीशी लढण्यासाठी राज्य सरकारनं डॉक्टरांचा टास्क फोर्स तयार केला आहे. त्या टास्क फोर्सच्या शिफारशींवर विचार करून राज्य सरकार अंतिम निर्णय घेत आहे. लोकल ट्रेन सुरू करण्याविषयी विचारलं असता आदित्य ठाकरे यांनी टास्क फोर्सकडं बोट दाखवलं. ‘लोकल ट्रेन सर्वसामान्यांसाठी सुरू करण्याची योग्य वेळ आली आहे असं जेव्हा टास्क फोर्सला वाटेल, तेव्हाच राज्य सरकार त्याबाबत निर्णय घेईल,’ असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. ‘कोविड संपला असं समजून चालणं चुकीचं ठरेल. आता दुसरी लाट ओसरली आहे, रुग्णसंख्या कमी झाली आहे. तिसऱ्या लाटेचीही चर्चा आहे. त्यामुळं कोविडपासून सुटका करून घेण्यासाठी अजून बराच वेळ लागेल. जास्तीत जास्त जीव वाचवणं हे सरकार म्हणून आमचं कर्तव्य आहे,’ असं ते म्हणाले. ते ‘एबीपी न्यूज’ या वृत्तवाहिनीशी बोलत होते.

विरोधकांकडं काही काम नाही म्हणून…

राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या कामाचंही आदित्य ठाकरे यांनी कौतुक केलं. ‘तीन पक्ष एकत्र येणं ही चांगली गोष्ट आहे. तिन्ही पक्षांची विचारसरणी काही प्रमाणात वेगळी आहे. त्यामुळं चर्चा होत असतात. पण त्याला वाद म्हणणं चुकीचं आहे. लोकशाहीमध्ये वेगवेगळे विचार एकत्र आले. त्यांच्यात संवाद होत राहिला तर कामही चांगलं होऊ शकतं. केवळ पाच वर्षेच नाही, यापुढेही हे सरकार चालू शकेल,’ असं आदित्य म्हणाले.

वाचा: परमबीर सिंग यांचे भवितव्य आज ठरणार; न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष

Source link

aaditya thackerayMumbai local trainsआदित्य ठाकरेकरोनाकोविडमहाविकास आघाडीमुंबई लोकल ट्रेन
Comments (0)
Add Comment