Holi Remedies and Benefits : होळीच्या दिवशी करा हे खास उपाय, आर्थिक वैवाहिक बाबतीत होतील अनेक शुभ लाभ

होळी आणि रंगपंचमी हे रंगांचे उत्सव आहेत. या दिवशी सर्व नागरिक रंगांची उधळण करतात. रंगपंचमीच्या ठिक एक दिवसआधी होळी साजरी करण्यात येते. होलिका दहन आणि पूजा करण्याचं महत्व पुराणात सुद्धा आहे. असं मानलं जातं की, होळीची पूजा केल्यास महालक्ष्मी देवी प्रसन्न होते. यंदाच्या वर्षी ६ मार्च रोजी होळी दहन आहे आणि ७ मार्च रोजी धुलीवंदन आहे. होलिका दहन करण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. जर तुम्ही या दिवशी काही खास उपाय केले तर संपूर्ण वर्षभर तुमच्या आयुष्यात सुख-समृद्धी नांदते आणि इतरही अनेक लाभ मिळू शकतात.

सर्व अडचणींवर करा हा उपाय

संध्याकाळी एक नारळ घेऊन संपूर्ण सोलावे त्याला शेंडी सुद्धा ठेवायची नाही च्या नारळाला तीन डोळे असतात त्यातील एक डोळा फोडून किंवा छिद्र करून त्यातील सर्व पाणी बाहेर काढावे आणि त्यामध्ये पूर्ण तूप भरावे तूप नारळामध्ये गच्च भरल्यानंतर एका कोऱ्या कागदावर आपल्या ज्या काही अडचणी असतील त्या सविस्तर लिहून त्या नारळावर ती चिट्ठी धरावी आणि लाल किंवा काळ्या धाग्याने नारळाला पूर्ण गुंडाळावे नारळ कुठेही दिसला नाही पाहिजे अशा प्रकारे पूर्ण दोऱ्याचे नारळाला वेस्टन करून ते नारळ होळीत विसर्जन करावे. नारळ विसर्जन करत असताना मनोमन अग्नी देवतेला प्रार्थना करावी.

या उपायाने धनहानी थांबते

एका विड्याच्या पानावर तुपात भिजवलेल्या दोन लवंगा, एक बत्ताशा ठेवावा. त्यानंतर ही सर्व सामग्री होळीमध्ये दहन करावी. यामुळे घरात कायम सुख समृद्धी राहील. होळीच्या रात्री मोहरी च्या तेलाचा चौमुखी दिवा घराच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर लावून त्याची पूजा करावी त्यानंतर लक्ष्मी नारायणांना सुख समृद्धी साठी प्रार्थना करावी. या उपायामुळे धनहानी थांबते.

या उपायाचा व्यापार व नोकरीला होईल फायदा

जर तुमचे पैसे कुणाकडे फसले असतील तर ११ गोमती चक्र हातात घेऊन पेटत्या होळीला ११ प्रदक्षीणा घालाव्यात, नंतर एका पांढऱ्या कागदावर रक्त चंदनाने ज्या व्यक्ती कडे पैसे अडकले आहेत त्याचं नाव लिहा आणि त्या कागदात ११ गोमती चक्र ठेवून पुडी बांधा आणी कुठेही खड्डा खणून गाडून टाका. तुमचे अडकलेले पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. जर व्यापार किंवा नोकरी मध्ये वृद्धी होत नसेल तर २१ गोमती चक्र होळीच्या रात्री शिवलींगावर अर्पण करावी. यामुळे नक्की फायदा होतो.

पत्रीकेत राहूची दशा असेल तर

जर कुणाच्या पत्रीकेत राहू च्या दशेमुळे समस्या निर्माण झाल्या असतील तर एक नारळ घेऊन त्याची शेंडी पूर्ण काढावी. नारळाला असणारा डोळा तोडून आतील पाणी पूर्ण काढावे, मग त्यात जवसाचे तेल भरावे. त्यामध्ये थोडा गुळ घाला आणी हा नारळ जळत्या होळीत अर्पण करा. या मुळे राहू चा प्रभाव समाप्त होतो.

भूत-प्रेत बाधा,नजर दोषा पासून मुक्ती मिळवण्यासाठी

जर तुमच्या घरात नकारात्मक शक्ती ,आत्म्यांचा वास असेल तर होळी पेटल्यानंतर त्यातील थोडासा अग्नी घरी घेऊन या आणि घरातील अग्नेय कोपऱ्यात तांब्याच्या किंवा मातीच्या भांड्यात तो अग्नी ठेवून द्या. त्याच्या समोर मोहरी च्या तेलाचा दिवा लावा. तुमची अडचण दूर होईल. होळी दहनानंतर दुसऱ्या दिवशी होळीतील थोडी राख घरी घेऊन या त्यात थोडीशी पिवळी मोहरी, साधी मोहरी आणी जाड मीठ घालून एका लाल कपड्यात बांधून ठेवा. यामुळे भूत-प्रेत बाधा, नजर दोषां पासून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे.

टीप : ही सर्व माहिती भाविकांची श्रद्धा लक्षात घेऊन दिली जात आहे, तुमच्या श्रद्धा आणि विश्वासावर ज्योतिष उपाय आणि सल्ला वापरून पाहा. याचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणे आहे. या संदर्भात आम्ही कोणताही दावा करत नाही.

Source link

holiholi 2023 in marathiholi 2023 remedy and benefit in marathiholi remedy for moneyholi upay for money and prosperityremedy and benefits in marathiहोळी 2023होळी उपायहोळीचे उपाय आणि फायदेहोळीच्या दिवशी कोणते उपाय करावे
Comments (0)
Add Comment