Airtel ने एकाचवेळी १२५ शहरात लाँच केली 5G सर्विस, आता मिळणार हाय स्पीड डेटा

नवी दिल्लीः टेलिकॉम कंपनी भारती एअरटेल यूजर्ससाठी एक मोठी गुड न्यूज आहे. कंपनीने १२५ शहरात हाय स्पीड डेटा 5G सर्विसेज सुरू केली आहे. यानंतर भारतातील एअरटेलची सर्विस आता २६५ शहरात सुरू करण्यात आली आहे. कंपनीने म्हटले की, १० मिलियन ५जी यूजर्सचे माइलस्टोन पूर्ण केले आहे.

कंपनीने म्हटले की, 5G इंटरनेटची जगात क्रांती आणली आहे. कनेक्टिविटी आणि कम्यूनिकेशनच्या नवीन युगाची सुरुवात झाली आहे. देशातील गेम चेंजर ठरली आहे. एअरटेल मध्ये आम्ही आपल्या ग्राहकांना हाय क्वॉलिटी नेटवर्क आणि सर्विस उपलब्ध करण्यासाठी कटीबद्ध आहे. सोबत हे ही सांगितले की, ऑक्टोबर २०२२ मध्ये 5G सर्विसेज करण्यासाठी Airtel पहिले टेलिकॉम ऑपरेटर होते. सरकारने ऑगस्ट २०२२ मध्ये टेलिकॉम सर्विस ऑपरेटर्सला स्पेक्ट्रम्स जारी केले होते. त्यात देशातील ५जी सर्विसेजचे रोलआउट करण्यासाठी तयार राहण्यास सांगितले होते.

वाचाः PAN कार्डशी Aadhaar कार्ड लिंक आहे की नाही, असं चेक करा, खूपच सोपी प्रोसेस

5G काय आहे, ३जी आणि ४जी सर्विसपेक्षा वेगळे कसे आहे
५जी, ५ जनरेशनचे मोबाइल नेटवर्क आहे. जे खूप फास्ट स्पीडने डेटाला ट्रान्सफर करण्यात सक्षम आहे. ३जी आणि ४जी च्या तुलनेत ५जी मध्ये खूप कमी लेटेंसी आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात यूजर्सचा एक्सपीरियन्स चांगला वाढणार आहे.

Airtel यूजर्सला 5G सर्विसेजसाठी काय काय हवे

  • यूजर्सला ५जी शहर किंवा त्या क्षेत्रात असणे गरजेचे आहे.
  • ५जी अॅक्सेस करण्यासाठी यूजर्सला आपल्या एअरटेल थँक्स अॅप मध्ये नोटिफिकेशन अलर्ट चेक करावे लागेल.
  • एअरटेल ५जी प्लस स्मार्टफोनचा एक्सपीरियन्स देण्यासाठी ग्राहकांना नेटवर्क टाइप मध्ये ५जी सिलेक्ट करावे लागेल.
  • यूजर्स आपल्या सध्याच्या सिम कार्डवर एअरटेल ५ज प्लस सर्विसचा वापर करू शकतात. त्यांना नवीन सिम कार्ड घेण्याची गरज नाही.
  • सर्व उपलब्ध डेटा प्लान वर Airtel 5G Plus सर्विस उपलब्ध करीत आहे. त्यामुळे कोणताही नवीन प्लान घेण्याची गरज नाही.

वाचाः १० हजारांपर्यंतचे ‘टॉप ५’ पैसा वसूल स्मार्टफोन्स; बॅटरी, कॅमेरा आणि प्रोसेसर जबरदस्त

Source link

Airtel 5G Plusairtel 5g plus in indiaairtel 5g plus networkairtel 5g plus new citiesairtel 5g plus serviceairtel 5g plus speed
Comments (0)
Add Comment