धुलीवंदनाला सर्वांच्या जीवनात खास शुभेच्छा देऊन भरा रंग, वाचा आणि पाठवा ‘हे’ संदेश

फाल्गुन पौर्णिमेच्या रात्री विधिपूर्वक होळी पेटवली जाते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा होळी विझलेली असते, तेव्हा तेथील राख एकमेकांच्या अंगाला फासून धुळवड खेळून नंतर आंघोळ केली जाते. यात रंगाचा वापर व्हायला लागलाय. त्यामुळे धुलीवंदनाला एकमेकांना रंग लावून धुळवड साजरी करतात. तसेच, फाल्गुन कृष्ण पंचमीच्या दिवशी रंग खेळण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे आणि म्हणूनच हा दिवस रंगपंचमी म्हणून ओळखला जातो. यामुळे फाल्गुन पौर्णिमेला हुताशनी पौर्णिमा म्हणजे होळी साजरी करतात, पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदन/धुळवड साजरा होतो आणि यानंतर येणाऱ्या पंचमीच्या दिवशी रंगपंचमी साजरी करतात.

धुलीवंदनाच्या शुभेच्छा

“सूर्याच्या दाहकतेवर करूया पाण्याचा शिडकाव
ह्रदयात मिसळूया स्नेह हास्याचा भाव,
होऊ तल्लीन सप्तसुरात,
रंगवू एकमेकांना सप्तरंगात.
धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा”

गोड धोड खाद्याचा घेऊया आस्वाद,
प्रेम भाव निर्माण करू,
मिटवूया एकमेकातला वाद
खेळूया रंग उधळूया रंग,
तुम्हाला धुळवडीच्या शुभेच्छा”

धुळवडीच्या हार्दिक शुभेच्छा

“नारिंगी रंग पळसाच्या फुलांचा
हिरवा, गुलाबी, गुलालाचा
पिचकारीत भरून सारे रंग
रंगवूया एकमेकांना
धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा!”

“भिजू दे रंग आणि अंग स्वच्छंद,
अखंड उडू दे मनि रंगतरंग
व्हावे अवघे जीवन दंग
असे उधळू आज हे रंग!
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा”

धुलीवंदनाच्या खूप खूप शुभेच्छा

“रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा,
रंग नात्यांचा, रंग बंधाचा,
रंग हर्षाचा, रंग उल्हासचा,
रंग नव्या उत्सवाचा,
साजरा करू होळी संगे…
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा”

“सुखाच्या रंगांनी आपले
जीवन रंगीबेरंगी होवो,
रंग गुलाल उधळू आणि,
रंगवूया रंगपंचमीच्या रंगात हे क्षण…
रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा! “

धुळवडीच्या शुभेच्छा

“लाल” रंग तुमच्या गालांसाठी,
“काळा” रंग तुमच्या केसांसाठी,
“निळा” रंग तुमच्या डोळ्यांसाठी,
“पिवळा” रंग तुमच्या हातांसाठी,
“गुलाबी” रंग तुमच्या होठांसाठी,
“सफेद” रंग तुमच्या मनासाठी,
“हिरवा” रंग तुमच्या आरोग्यासाठी,
होळीच्या या सात रंगांसोबत,
तुमचे जीवन रंगून जावो…
धुळवडीच्या खूप खूप शुभेच्छा

Source link

dhulivandan 2023dhulivandan quotesdhulivandan whatsapp status and messagesdhulivandan wishes in marathidhulwad 2023Wishesधुलीवंदन 2023धुलीवंदनाच्या शुभेच्छाधुळवडधुळवड2023शुभेच्छा
Comments (0)
Add Comment