गडचिरोलीत आणखी एका हत्तीचा मृत्यू, एकाच आठवड्यात दुसरी घटना

हायलाइट्स:

  • गडचिरोलीत आणखी एका हत्तीचा मृत्यू
  • एकाच आठवड्यात दुसरी घटना
  • मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अजूनही कळू शकले नाही

गडचिरोली : महाराष्ट्रातील एकमेव शासकीय हत्ती कॅम्प असलेल्या कमलापूर येथे आज आणखी एका हत्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळे वन विभागात एकच खळबळ उडाली आहे. नुकतेच ३ आगस्ट रोजी ‘सई’ या हत्तीचा मृत्यू झाला होता. मृत्यूचं नेमक कारण काय हे अजूनही कळले नाही. शवविच्छेदन अहवाल येण्यापूर्वीच आज आणखी एका हत्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

आज अचानक मृत्यू झालेल्या हत्तीचे नाव ‘अर्जुन’ असून मंगला या हत्तीणीने १५ जानेवारी २०१९ ला मकर संक्रांतीचा शुभ पर्वावर जन्म दिला होता. त्याचे नामकरण करून ‘अर्जुन’असे नाव ठेवण्यात आले होते. केवळ तीस महिन्याचा अर्जुन या नावाच्या हत्तीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अजूनही कळू शकले नाही. मात्र,अहेरी तालुक्यातील कमलापूर वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या शासकीय हत्ती कॅम्प मध्ये नेमकं चाललंय तरी काय ? असा सवाल वन्यप्रेमी कडून करण्यात येत आहे.
फेसबूक लाईव्ह करत तरुणाची आत्महत्या, कारण ऐकून सगळ्यांनाच बसला धक्का
२९ जून २०२० ला ‘आदित्य’ नावाच्या ४ वर्षीय हत्तीचा मृत्यू झाला होता. ११ जून २०२० रोजी आदित्य हा चिखलात अडकला आणि त्याची प्रकृती बिघडली होती. वन विभागाने त्याच्यावर उपचार सुरू केले होते. मात्र, येथील कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षित पणामुळे पुन्हा एकदा आदित्य नावाचा हत्ती पाईपलाईनचा खड्ड्यात पडल्याने त्याचा मृत्यू झाला होता. त्याच वेळी कमलापूर वनपरिक्षेत्राच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होता. त्यानंतरही येथील कुठल्याही कर्मचारी वर कारवाई करण्यात आलेली नाही.

आता नुकतेच ३ ऑगस्ट रोजी ‘सई’ नावाच्या ३२ महिन्याचा हत्तीचा मृत्यू झाला. त्याचे शवविच्छेदन अहवाल अजूनही प्राप्त झाले नसतानाच आज आणखी एका हत्तीचा मृत्यू झाल्याने आता सिरोंचा वनविभागाचा कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. आता तरी सिरोंचा वन विभागाला जाग येईल का ? आणि वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भाजप-मनसे एकत्र येणार; राज भेटीनंतर चंद्रकांत पाटलांनी मांडली भूमिका

Source link

elephant diesgadchiroli current newsgadchiroli current weathergadchiroli newsgadchiroli news todaygadchiroli news today live marathi
Comments (0)
Add Comment