ती ला प्रणाम करूया आणि जागतिक महिला दिन साजरा करूया, त्यासाठी या शुभेच्छा संदेशाचा होईल उपयोग, वाचा आणि पाठवा

८ मार्च १९०८ रोजी न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री-कामगारांनी रुटगर्स चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली. दहा तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता ह्या मागण्या केल्या. या दोन मागण्यांबरोबरच लिंग, वर्ण, मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमीनिरपेक्ष सर्व प्रौढ स्त्री-पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा अशी मागणीही जोरकसपणे केली. स्त्री-कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ, ८ मार्च हा ‘जागतिक महिला-दिन’ म्हणून स्वीकारावा असा जो ठराव क्लाराने मांडला, तो पास झाला. भारतात मुंबई येथे पहिला ८ मार्च हा महिला दिवस १९४३ साली साजरा झाला. १९७१ सालच्या ८ मार्चला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने ‘जागतिक महिला वर्ष’ म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली.

जागतिक महिला दिन शुभेच्छा

“ती आहे म्हणून सारे विश्र्व आहे
ती आहे म्हणून सारे घर आहे
ती आहे म्हणून सुंदर नाती आहेत
ती आहे म्हणून नात्यांमध्ये प्रेम आहे”
महिला दिनाच्या सर्व महिलांना खूप खूप शुभेच्छा”

“आदिशक्ती तू, प्रभूची भक्ती तू,
झाशीची राणू तू
जगत जननी तू
मावळ्यांचा भवानी तू
प्रयत्नांनाा लाभलेली उन्नती तू
आजच्या युगाची प्रगती तू
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा”

महिला दिनाच्या शुभेच्छा

“तुझ्याविना वैकुंठाचा कारभार चालना
एकल्या विठुरायाला हो संसार पेलना
तू सकलांची आई साताजन्माची पुण्याई
तुझी थोरवी महान तिन्हीलोकी तुला मान”
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

“ती आई आहे, ती ताई आहे,
ती मैत्रिण आहे, ती पत्नी आहे,
ती मुलगी आहे, ती जन्म आहे, ती माया आहे,
ती सुरूवात आहे आणि तिच नसेल तर सारं काही व्यर्थ आहे.
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा”

जागतिक महिला दिनाच्या खूप शुभेच्छा

“स्त्री म्हणजे अडथळ्यांवर मात,
स्त्रा म्हणजे क्षणांची साथ
तुझ्या कतृत्वाला सर्वांचा प्रणाम
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा”

“तुझ्या उत्तुंग भरारीपुढे
गगनही ठेंगणे भासावे
तुझ्या विशाल पंखाखाली
विश्व ते सारे विसावे
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा”

महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

“स्त्री म्हणजे वास्तव्य,
स्त्री म्हणजे मांगल्य,
स्त्री म्हणजे मातृत्व,
स्त्री म्हणजे कतृत्व,
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा”

“आईच्या वात्सल्याला प्रणाम
बहिणीच्या प्रेमाला प्रणाम
मैत्रिणीच्या विश्वासाला प्रणाम
पत्नीच्या खंबीर पाठिंब्याला प्रणाम
माझ्या आयुष्यातील प्रत्येक स्त्री शक्तीला प्रणाम
महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा”

Source link

happy womens daywomens day in marathiwomens day messageswomens day quotes whatsapp statuswomens day wishesWomen’s Day 2023जागतिक महिला दिनजागतिक महिला दिन 2023महिला दिनाच्या शुभेच्छा
Comments (0)
Add Comment