हायलाइट्स:
- अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढणार
- ईडीकडून चारवेा बजावण्यात आले समन्स
- नागपुरात तीन ठिकाणी छापेमारी
नागपूरः राज्याचे माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh)यांच्या अडचणीत अधिक वाढ झाली आहे. सक्त वसुली संचालनायलयाने (ईडी) अनिल देशमुख यांच्या शिक्षण संस्थेसह अन्य दोन ठिकाणी छापा टाकला आहे. शुक्रवारी ईडीने ही कारवाई केली आहे.
अनिल देशमुख यांनी १०० कोटी रुपये खंडणी मागितल्याचा आरोप मुंबईचे तत्कालिन पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला होता. त्यानंतर ईडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. ‘ईडी’च्या बलार्ड पिअर येथील प्रादेशिक संचालनालयाने अनिल देशमुख व त्यांचा मुलगा ऋषिकेश याला आतापर्यंत चारवेळा चौकशीसाठी समन्स बजावले. पण ते उपस्थित राहिले नाहीत. देशमुखांच्या शोधासाठी ईडीचे पथक त्यांच्या काटोल येथील घरी गेले होते. पण तेथेही ते सापडले नाहीत. त्यानंतर ईडीने अनिल देशमुख यांच्याभोवतीचा करावाईचा फास अधिकाअधिक घट्ट आवळला आहे.
निवडणुकांसाठी अनोखी आयडिया; गटारीनिमित्त शिवसेनेकडून अल्प दरात चिकन
ईडीने शुक्रवारी अनिल देशमुख यांच्या संबंधित ठिकाणांवर छापे टाकले आहेत. अनिल देशमुख यांच्या नागपूरातील फेटरी येथील महाविद्यालयावर छापा टाकल्याची माहिती मिळत आहे. त्याचसोबत नागपुरातील आणखी दोन ठिकाणांवर ईडीने छापेमारी केली आहे. कटोल मार्गावर असलेल्या अनिल देशमुख यांचं नागपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एनआयटी) महाविद्यालयावर छापे टाकले आहेत. यावेळी पोलिसांचा प्रचंड ताफा ईडी अधिकाऱ्यांसोबत होता. त्यात सीआरपीएफच्या महिला बटालियनचाही समावेश होता.
महाराष्ट्राला करोना लढ्यात मोठा दिलासा; ‘हे’ जिल्हे झाले करोनामुक्त
१०० कोटींच्या मागणीचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर सीबीआयने देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. कोलकाता येथे दोन बनावट कंपनीचे दस्तऐवज सीबीआयला आढळले होते. या बनावट कंपनीद्वारे कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाले. ते देशमुखांशी संबंधित असल्याचा संशय सीबीआयला आला. तसंच, देशमुख यांना ४० कोटी रुपयांची खंडणी मुंबईतील बारमालकांकडून मिळाली असल्याची ठोस माहिती ‘ईडी’ला मिळाली असल्याचं सूत्रांकडून समजतंय.
युवासेनेला मिळणार नवा अध्यक्ष; वरुण सरदेसाईंचं नाव चर्चेत?