आयपीएस नितिका गेहलोत यांनी केवळ १० दिवसांची प्रसूती रजा घेतली आणि ११ व्या दिवशी आपल्या नवजात मुलीला हातात घेऊन कर्तव्यावर रुजू झाल्या. जिल्हा पोलीस कार्यालयात एसपी मॅडमच्या कामाविषयीची तळमळ पाहून तैनात असलेले सर्व कर्मचारी थक्क झाले.
महिलांसाठी एक उदाहरण बनलेल्या एसपी नितिका गेहलोत सध्या आपल्या मुलीला मांडीवर घेऊन कार्यालयात लोकांच्या तक्रारी ऐकतात आणि सर्व जबाबदाऱ्या अतिशय चोखपणे पार पाडत आहेत. संध्याकाळी पाच नंतरही त्या अनेकदा कार्यालयात तक्रारी ऐकताना दिसतो.
गेल्या अडीच वर्षांपासून हांसी पोलीस जिल्ह्याचे नेतृत्व करणाऱ्या आयपीएस नितिका गेहलोत यांनी या भागातील गुन्हेगारी कारवाया रोखण्यासाठी अनेकदा पुढाकार घेतला आहे. आपल्या कर्तव्याबाबत त्या सजग असतात आणि छोट्या छोट्या घटनांवर स्वतः लक्ष ठेवतात.
गेल्या वर्षी, हांसी हा प्रदेश संपूर्ण राज्यात सायबर गुन्ह्यांची प्रकरणे सोडवण्यात दुसरा आणि अमली पदार्थांची प्रकरणे पकडण्यात तिसरा होता. याशिवाय एसपी नितिका गेहलोत यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा पोलिसांनी ४ किलो अफूचे हायप्रोफाईल प्रकरणही पकडले. याप्रकरणी महिला आरोपींना नेपाळमधून अटक करण्यात आली होती. वाहनचोरीच्या घटनांमध्येही त्यांच्या नेतृत्वाखाली हांसी पोलिसांना मोठे यश मिळाले आहे.