पुणेकर ओमकारला ब्रिटिश काऊन्सिलची फेलोशिप

British Council Fellowship: व्हेनीस इटली याठिकाणी दर दोन वर्षांनी होणाऱ्या व्हेनीस बिनाले या जागतिक वास्तुकला प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी पुणेकर वास्तू विशारद ओमकार संजय साळवी याची निवड करण्यात आली आहे.

व्हेनीस बिनाले या अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या प्रदर्शनात ओमकार साळवी याची निवड ही कौतुकास्पद बाब आहे. ओंकार हा मूळ पुण्याचा असून त्याने २०२१ साली पुणे विद्यापीठातून डिस्टींकशन सह बी.आर्क केले आहे व तो सध्या मँचेस्टर मेट्रोपॉलिटन युनिव्हर्सिटी मध्ये एम.आर्क करत आहे. त्याचा एम.आर्कच्या पहिल्या वर्षाच्या एका प्रकल्पाला ब्रिटेन मधील वास्तू विशारदांच्या जुरीने सर्वोत्तम ठरवले होते. त्याला ह्या प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी ब्रिटिश काऊन्सिलची फेलोशिप मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून कौतुकांचा वर्षाव होत आहे.

व्हेनीस बिनालेमध्ये सहभागी होण्यासाठी मँचेस्टर मेट्रोपॉलिटन युनिव्हर्सिटीमध्ये फक्त दोन विद्यार्थी निवडले गेले आहेत. त्यामध्ये ओंकार हा एकमेव भारतीय आहे. ओमकारचे वडील हे भारतीय नौदलातून सेवानिवृत्त झाले आहेत. ओमकार आपल्या या यशाचे श्रेय आपल्या पालकांना देतो.

इटलीमधील व्हेनीस हे ऐतिहासिक शहर वैविध्यपूर्ण, रचनात्मक जुने वाडे / गड / किल्ले, त्यांच्या अनोख्या वास्तुरचना आणि वास्तूशिल्पांसाठी संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. याठिकाणी दर दोन वर्षांनी होणाऱ्या व्हेनीस बिनाले या वास्तुकला प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी अनेकजण उत्सुक असतात. या प्रदर्शनात मांडलेल्या कलाकृती वास्तुकलेच्या दृष्टीने आगळ्यावेगळ्या असतात. या कलाकृतींमधून विद्यमान सामाजिक, मानवी व तांत्रिक रचनांचे काही भविष्यकालीन पर्याय व स्वरुप उलगडते असे मानले जाते.

Source link

Career Newseducation newsFellowship of British CouncilMaharashtra TimesOmkar SalaviPune Omkar Salaviपुणेकर ओमकार साळवीब्रिटिश काऊन्सिलची फेलोशिप
Comments (0)
Add Comment