‘राजीव गांधींच्या नावानं ‘खेल रत्न’ चालत नाही, मग मोटेरा स्टेडियमला क्रिकेटपटूऐवजी मोदींचं नाव का?’

हायलाइट्स:

  • राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे नाव बदलले
  • मोदी सरकारच्या निर्णयावर काँग्रेसची जोरदार टीका
  • गांधी-नेहरू द्वेषातून निर्णय घेतल्याचा काँग्रेसचा आरोप

मुंबई: ‘राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचं नाव बदलून ‘मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार’ असं करण्याच्या निर्णयाचे तीव्र राजकीय पडसाद उमटत आहेत. काँग्रेसनं मोदी सरकारच्या या निर्णयाचा जोरदार निषेध केला आहे. ‘केंद्रातील भाजप सरकार व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला नेहरू-गांधी नावाचा प्रचंड तिरस्कार आहे. या तिरस्काराच्या मानसिकतेतूनच हा निर्णय झाला आहे. ‘राजीव गांधी यांच्या नावालाच विरोध असेल तर मग नरेंद्र मोदी यांचे क्रीडा क्षेत्रातील योगदान काय? अहमदाबादमधील मोटेरा क्रिकेट स्टेडियमलासुद्धा एखाद्या महान क्रिकेटपटूचं नाव का नाही,’ असा खडा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

वाचा: लोकल प्रवासाची प्रतीक्षा संपली; आदित्य ठाकरे यांचं मोठं विधान

‘हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांचे हॉकीतील योगदान मोठं आहे. त्यांच्या सन्मानार्थ दुसरा पुरस्कार देता आला असता किंवा त्यांच्या नावानं क्रीडा क्षेत्रासाठी मोठी योजना राबवता आली असती, त्यातून मेजर ध्यानचंद यांचा सन्मानच झाला असता, त्यांच्या नावाला विरोध असण्याचं कारणच नाही. त्यांचं नाव दिल्याचा आम्हाला आनंदच आहे, परंतु केवळ गांधी द्वेषातून नाव बदलणं हे हीन पातळीच्या राजकारणाचं दर्शन घडवतं,’ असं पटोले यांनी म्हटलं आहे. ‘राजीव गांधी यांनी आधुनिक भारतासाठी मोठं योगदान दिलं आहे. त्यांच्या नावानं असलेल्या या पुरस्काराच्या माध्यमातून क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा यथोचित सन्मान केला जात असे. राजीव गांधी यांचं देशाच्या विकासातील योगदान व कोट्यवधी लोकांच्या मनातील स्थान मोठं असून अशा पद्धतीनं तसूभरही कमी होणार नाही,’ असंही पटोले म्हणाले.

वाचा: शेतात टाकला होता बनावट नोटांचा छापखाना; वर्षभर नोटा खपवल्या, पण त्या दिवशी…

‘राजीव गांधी यांच्या नावालाच विरोध असेल तर मग नरेंद्र मोदी यांचं क्रीडा क्षेत्रातील योगदान तरी काय? अहमदाबादमधील मोटेरा क्रिकेट स्टेडियमलासुद्धा एखाद्या महान क्रिकेटपटूचं नाव देता आलं असतं परंतु सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम हे नाव बदलून नरेंद्र मोदी स्टेडियम केलं गेलं. खरं तर राजीव गांधी यांचं नाव बदलल्यानं आश्चर्य वाटत नाही, ही कृत्ती भाजप व संघाच्या द्वेषमूलक वृत्तीतून आलेली आहे. क्रीडा क्षेत्रासाठी असलेली आर्थिक तरतूद कमी करायची आणि दुसरीकडं आपलं सरकार क्रीडा क्षेत्र व खेळाडूंचं किती हित जपतं हे दाखवण्यासाठी असं केविलवाणं काम करायचं, यातून क्रीडा क्षेत्राचा अथवा खेळाडूंचा कोणताच फायदा होणार नाही, असंही पटोले म्हणाले.

वाचा: भाजप-मनसे एकत्र येणार; राज भेटीनंतर चंद्रकांत पाटलांनी मांडली भूमिका

Source link

Congress on Renaming Khel Ratna AwardCongress Reaction on Khel Ratna RenamingCongress vs BJPKhel Ratna Award rename updateNana Patole Attacks BJPRajiv Gandhi Khel Ratnaनाना पटोलेराजीव गांधी खेल रत्न पुरस्कार
Comments (0)
Add Comment