अनेक प्रकारचे एसी उपलब्ध
मार्केट मध्ये अनेक प्रकारचे एसी उपलब्ध आहेत. हे एसी ०.८ टन, १ टन आणि १.५ टन आणि २ टन क्षमते सोबत येतात. सोबत सोलर एसी विंडो आणि स्प्लीट ऑप्शन मध्ये सुद्धा येतात. यूजर्स आपल्या खोलीच्या हिशोबानुसार, एसीची निवड करू शकतात.
वाचाः अमेरिकन कंपनीचे ५५ इंचापर्यंतचे तीन टीव्ही भारतात लाँच, किंमत ६९९९ रुपयांपासून सुरू
दर महिना साडे चार हजार रुपयाची बचत
जर तुम्ही नॉर्मल एसीचा वापर करीत असाल तसेच दिवसभरात १४ ते १५ तास एसी चालवत असाल तर जवळपास २० यूनिटचा खर्च येतो. यामुळे संपूर्ण महिन्यात ६०० यूनिटचा खर्च होतो. याच प्रमाणे ४५०० रुपयाच्या विजेचे बिल येते. परंतु, सोलर एसी चालवल्यास विजेचे बिल काहीच येत नसल्याच्या बरोबर आहे. नॉर्मल एसीच्या तुलनेत सोलर एसीत ९० टक्के विजेच्या बिलाची बचत होते. सोलर एसीचे मेटेंनेंसचा खर्च खूपच कमी आहे. सोबत सोलर एसी पर्यावरण या हिशोबानुसार, खूपच फायदेमंद आहे. सोलर एसी ५ स्टार रेटिंग सोबत येतात. सोलर पॅनेल मध्ये केवळ बॅटरी रिप्लेसमेंटचा खर्च येतो. सोलर एसी या उन्हावर चालतात.
वाचाः iPhone 14 आणि iPhone 14 Plus नव्या रंगात लाँच, आता या कलरमध्येही मिळेल आयफोन
किंमत किती
एक टन क्षमतेच्या सोलर एसीची किंमत १ लाख रुपयांपर्यंत असेल. तर १.५ टन क्षमतेच्या एसीची किंमत २ लाख रुपये पर्यंत आहे. सोलर एसी वन टाइम इन्वेस्टमेंट प्लान आहे. या प्लानमध्ये एकदा खर्च केल्यास २५ वर्षांपर्यंत फ्री मध्ये नॉन स्टॉप एसीचा वापर करता येवू शकतो.
वाचाः Happy Women’s Day 2023 : हे आहेत बेस्ट फोटो एडिटिंग ॲप्स, पाहा डिटेल्स