Disney+ Hotstar वर दिसणार नाही HBO कंटेंट
म्हणजेच आता डिज्नी प्लस हॉटस्टार यूजर्स द लास्ट ऑफ अस, सक्सेशन, गेम ऑफ थ्रोन्स, हाउस ऑफ द ड्रॅगन, द वायर, द सोप्रानोस, सिलिकॉन व्हॅली सारखे कंटेंट पाहू शकणार नाहीत. Disney+ Hotstar च्या प्लॅटफॉर्मवर नुकतेच हिट्स पैकी एक HBO ची नवीन टीवी सीरीज़ द लास्ट ऑफ अस आहे.
IPL चीही मजा लुटता येणार नाही
मिळालेल्या माहितीनुसार, Disney+ Hotstar भारतीय यूजर्सला IPL स्ट्रीमिंग सोबत करणार नाही कारण, यात Viacom18 चे स्ट्रीमिंग अधिकार गमावले आहेत. हा Disney+ Hotstar सब्क्रायबर्ससाठी मोठा झटका आहे. Disney+ Hotstar चे प्रीमियम सब्सक्रिप्शन सध्या भारतात १४९९ रुपये किंमतीत उपलब्ध आहे. प्लॅटफ़ॉर्म वरून IPL आणि HBO कंटेंट हटवल्यानंतर भारतीय यूजर्ससाठी Disney+ Hotstar च्या यूजर्सला मोठा झटका बसू शकतो.
वाचाः एकदा रिचार्ज करा अन् २५२ दिवस टेन्शन फ्री राहा, जिओच्या या प्लानपुढे Airtel-Vi पडले मागे
ट्विट करून दिली माहिती
एका ट्विटला उत्तर देताना @Hotstar_Helps ने म्हटले की, ३१ मार्च पासून HBO कंटेंट Disney+ Hotstar वर उपलब्ध नसणार आहे. तुम्ही १० भाषेत टीव्ही शो आणि चित्रपट १ लाखांहून जास्त कंटेट Disney+ Hotstar च्या मोठ्या लायब्रेरी आणि प्रमुख कव्हरेजचा आनंद घेवू शकता. अनेक भारतीय टेलीकॉम ऑपरेटरों ने Disney+ Hotstar बंडल्ड प्रीपेड प्लान्सला कमी केले आहे. Disney+ Hotstar वरून IPL आणि HBO कंटेंट गेले आहे. परंतु, प्लॅटफॉर्मवर अजूनही डिज्नी आणि मार्वल कंटेंटचे अधिकार आहेत. यासाठी यूजर्स याचे सब्सक्रिप्शन घेवू शकतात.
वाचाः iPhone 14 आणि iPhone 14 Plus नव्या रंगात लाँच, आता या कलरमध्येही मिळेल आयफोन