अमिताभ यांचे या क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न अपूर्णच

Amitabh Bachchan Education Details: बॉलीवूडचे ‘शहेनशाह’ अमिताभ बच्चन यांचा जन्म ११ ऑक्टोबर १९४२ रोजी ब्रिटिश भारतातील अलाहाबाद येथे झाला. २०२३ मध्ये ते ८१ वा वाढदिवस साजरा करतील. त्यांचे पूर्ण नाव अमिताभ हरिवंश बच्चन आहे. त्यांचे खरे आडनाव श्रीवास्तव होते, जे त्यांच्या वडिलांनी बदलून बच्चन केले. पूर्वी त्यांचे नाव इन्कलाब असे होते पण कवी सुमित्रानंदन पंत यांच्या सूचनेनंतर त्यांचे नाव अमिताभ असे ठेवण्यात आले, याचा अर्थ ‘कधीही कमी न होणारा प्रकाश’.

सुशिक्षित स्टार्समध्ये अमिताभ बच्चन यांचे नाव पहिले जाते. अमिताभ बच्चन सुरुवातीपासूनच अभ्यासात टॉपर आहेत. त्यांनी सुरुवातीचे शिक्षण शेरवुड कॉलेज नैनिताल येथून केले. यानंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या किरोरी माल महाविद्यालयातून शिक्षण घेतले.

अमिताभ बच्चन यांचे वडील हरिवंशराय बच्चन हे हिंदीतील प्रसिद्ध कवी होते. त्यांची आई तेजी बच्चन पाकिस्तानातील लायलपूर (फैसलाबाद) येथील शीख समुदायातील होती. ३ जून १९७३ रोजी अमिताभ यांनी त्यांची सह-अभिनेत्री जया भादुरीसोबत लग्न केले. दोघांना अभिषेक बच्चन आणि श्वेता नंदा (अमिताभ बच्चन फॅमिली) ही दोन मुले आहेत. अमिताभ बच्चन अनेकदा त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर त्यांच्या कुटुंबाचे फोटो शेअर करत असतात.

अमिताभ बच्चन यांना वाचनाची आणि लेखनाची खूप आवड आहे. ते सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. अमिताभ यांनी अलाहाबाद येथील ज्ञान प्रबोधिनी बॉईज हायस्कूलमधून शिक्षण घेतले आहे. त्यांनी पुढील शिक्षण नैनितालच्या शेरवुड कॉलेजमधून केले. यानंतर त्यांनी नवी दिल्लीतील प्रसिद्ध किरोरी माल महाविद्यालयातून बीएस्सी पदवी मिळवली आहे.

जीम ट्रेनर ते प्रभावशाली अभिनेता, शरद केळकरचे शिक्षण ऐकून तुम्हालाही वाटेल आश्चर्य
अमिताभ बच्चन यांना इंजिनीअर व्हायचे होते पण नशिबाने काही वेगळेच लिहिले होते. त्यांनी १९६९ मध्ये सात हिंदुस्तानी या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. बॉलीवूडचा सुपरस्टार होण्याआधी त्यांनी खूप मोठा स्ट्रगलचा काळ पाहिला. त्यांचे अनेक चित्रपट फ्लॉप केले. अमिताभ यांनी ‘ऑल इंडिया रेडिओ’मध्ये अँकरिंगसाठी ऑडिशन दिले होते. पण जड आवाजामुळे त्यांना नोकरी नाकारण्यात आली. यानंतरही त्यांनी हार मानली नाही. २००० मध्ये त्यांनी ‘कौन बनेगा करोडपती’ या क्विझ शोद्वारे छोट्या पडद्यावर पदार्पण केले.

अमिताभ बच्चन यांचे ‘जलसा’ हे घर मुंबईतील जुहू भागात आहे. या घरात ते आपल्या संपूर्ण कुटुंबासह राहतात. येथे दर रविवारी ते आपल्या चाहत्यांना भेटतात. त्यांचे दुसरे घर ‘जनक’ येथून जवळच्या अंतरावर आहे. अमिताभ आपल्या आई-वडिलांसोबत ‘प्रतिक्षा’ नावाच्या बंगल्यात राहत होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमिताभ यांची दुबई आणि पॅरिसमध्येही घरे आहेत.

Rishabh Pant Birthday: ऋषभ पंतने कुठून शिक्षण घेतलंय? जाणून घ्या
शिवसेनेची धडाडणारी तोफ सुषमा अंधारे यांनी ५१ रुपये घेऊन सोडलं होतं घर..त्यांच्या शिक्षणाविषयी जाणून घ्या

Source link

Amitabh Bachchan AgeAmitabh Bachchan Education DetailAmitabh Bachchan Education QualificationAmitabh Bachchan FamilyAmitabh Bachchan HouseAmitabh Bachchan kbcAmitabh Bachchan MoviesAmitabh Bachchan TwitterAmitabh Bachchan videoBig B BirthdayCeleb Educationअमिताभ बच्चनबॉलीवुड
Comments (0)
Add Comment