Vodafone Idea ने गुपचूप या दोन प्लानमध्ये केला बदल, आता जास्त डेटा आणि वैधता मिळणार

नवी दिल्लीः वोडाफोन आयडियाने आपल्या ग्राहकांना खूष करण्यासाठी गुपचूपपणे दोन रिचार्ज प्लानमध्ये जास्त बेनिफिट दिले आहे. खरं म्हणजे वोडाफोन आयडियाने आपल्या १९५ रुपये आणि ३१९ रुपयाच्या प्रीपेड प्लानला रिवाइज केले आहे. टेलिकॉम कंपनीने या दोन स्वस्त प्लान सोबत कंपनी आता जास्त फायदे देत आहे. या प्लानमध्ये काय काय जास्त बेनिफिट्स मिळणार आहेत, जाणून घ्या डिटेल्स.

वोडाफोन आयडियाच्या १९५ रुपये प्लानमधील फायदे
सर्वात आधी वोडाफोन आयडिया १९५ रुपयाच्या प्लानबद्दल माहिती जाणून घेवूयात. या प्लानमध्ये आता आधीच्या तुलनेत जास्त बेनिफिट्स मिळतील. या पॅकमध्ये यूजर्सला २ जीबी डेटा मिळत होता. आता या प्लानमध्ये ३ जीबी डेटा दिला जाणार आहे. याशिवाय, या रिचार्ज मध्ये आधीच्या प्रमाणे 300SMS आणि अनलिमिटेड कॉलिंग मिळत राहिल. तसेच या प्लानमध्ये १ महिन्याची वैधता दिली जात आहे. याशिवाय, या प्लानमध्ये Vi Movies & TV चे बेनिफिट मिळेल.

वाचाः फिट करण्याचं टेन्शन नाही, कधीही कुठेही घेवून जावू शकता हे Portable AC, भर उन्हात जाणवणार थंडी

वोडाफोन आयडियाचा ३१९ रुपयाचा प्लान

वोडाफोन आयडियाचा ३१९ रुपयाच्या प्लानमध्ये आता २ जीबी डेटा मिळतो. डेली १०० एसएमएस मिळते. या प्लानमध्ये हिरो अनलिमिटेड बेनिफिट्सचा लाभ मिळतो. याच्या मदतीने बिंज ऑल नाइट, रोल ओव्हर डेटा आणि Vi Movies & TV चे बेनिफिट दिले जाते. परंतु, हे सर्व बेनिफिट्स आधीपासून मिळत होते. परंतु, कंपनीने या प्लानची वैधता वाढवली आहे. आधी या प्लानची वैधता १ महिन्यासोबत येत होती. आता ही वैधता ३१ दिवस इतकी मिळणार आहे.

वाचाः जिओची साताऱ्यासह आणखी २७ शहरात 5G सर्विस सुरू, पाहा संपूर्ण शहराची लिस्ट

२९६ रुपयाचा रिचार्ज प्लान
टेलिकॉम कंपनी वोडाफोन आयडियाने नुकताच २९६ रुपयाचा रिचार्ज प्लान लाँच केला होता. या नवीन प्रीपेड प्लान सोबत तुम्हाला एकूण २५ जीबी सुपरफास्ट इंटरनेट डेटा आणि ३० दिवसाची वैधता मिळेल. तसेच यूजर्सला Vi Movies & TV Classic चे सब्सक्रिप्शन मिळेल.

वाचाः थेट १० हजाराचा डिस्काउंट, Xiaomi 13 Pro चा आज पहिला सेल

Source link

vodafone ideavodafone idea newsvodafone idea planvodafone idea prepaid planvodafone idea prepaid plansvodafone idea recharge plansVodafone Idea RevisedVodafone Idea Revised Plan
Comments (0)
Add Comment